कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये आग

By नामदेव मोरे | Updated: January 26, 2025 20:35 IST2025-01-26T20:35:02+5:302025-01-26T20:35:40+5:30

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क , नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केट मध्ये सात वाजण्याच्या सुमारास आग लागली. ...

fire breaks out at agricultural produce market committee fruit market | कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये आग

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये आग

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क , नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केट मध्ये सात वाजण्याच्या सुमारास आग लागली. वाशी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहचले आहे.

फळ मार्केटमधील निर्यात भवन इमारतीच्या मागील बाजूला ही आग लागली. येथे अनधिकृतपणे काही व्यक्तींनी भंगार व्यवसाय सुरू केला. सार्वजनिक जागेचा दुरूपयोग केला जात  आहे. भंगार दुकानात काम करणारांच्या निष्काळजीपणामुळे ही आग लागली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आग लागलेल्या ठिकाणाजवळ महावितरण चे सबस्टेशन ही आहे. अग्निशमन दलाने वेळेत आग विझविण्यास सुरूवात केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.  भंगार दूकानांवर कारवाई करण्याची मागणी व्यापा-यांनी केली आहे.

Web Title: fire breaks out at agricultural produce market committee fruit market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.