घणसोलीत डेकोरेटर्सच्या गोडाऊनला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 04:52 PM2020-04-04T16:52:06+5:302020-04-04T16:52:17+5:30
गणपतीचे रंगकाम करण्याच्या मशीनमधील सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागली.
नवी मुंबई - डेकोरेटर्सचे साहित्य साठवण्यासाठी केलेल्या गोडाऊनला आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. त्यामध्ये जीवितहानी झाली नसून तिथले साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. गणपतीचे रंगकाम करण्याच्या मशीनमधील सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागली.
घणसोली कौल आळी परिसरात ही घटना घडली. त्याठिकाणी पत्र्याचे शेड उभारून गोडाऊन तयार करण्यात आले होते. त्यामध्ये डेकोरेटर्सचे साहित्य तसेच गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे साचे व रंगकाम करण्याच्या मशीन ठेवण्यात आल्या होत्या. लॉकडाऊनमुळे अनेक दिवसांपासून त्याठिकाणी कोणी फिरकले नव्हते. दरम्यान मूर्तीला रंगकाम करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीन मधील सिलेंडरचा गर्मीमुळे स्फोट झाला. त्यामुळे लागलेल्या आगीमध्ये डेकोरेशनचे साहित्य, बांबू, कार्पेट यांनी पेट घेतला. त्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. दुर्घटनेची माहिती मिळताच कोपर खैरणे व ऐरोली अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. यामुळे काही अंतरावरच असलेल्या तबेला व रहिवाशी घरांचा धोका टळला. या आगीमध्ये डेकोरेटर्स संतोष चव्हाण व मूर्तिकार स्वप्नील साठे यांचे नुकसान झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : बापरे! दिल्लीतील तब्बल 108 डॉक्टर आणि नर्स क्वारंटाईन
Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी गुगलचं खास डुडल, सुरक्षिततेसाठी सांगितला उत्तम उपाय
Coronavirus : कोरोना हेल्मेट पाहिलंत का?, जनजागृतीसाठी 'त्याने' लढवली अनोखी शक्कल
Coronavirus : धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने दाम्पत्याची आत्महत्या, पोस्टमार्टम करण्यास डॉक्टरचा नकार
Coronavirus : हॉटेलपासून ट्रेनपर्यंत देशातील 'या' ठिकाणांचं होणार क्वारंटाईन सेंटरमध्ये रूपांतर