ऐरोलीत कोरोना उपचार केंद्रामध्ये लागली आग, कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा धोका टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:33 AM2021-04-17T04:33:26+5:302021-04-17T04:33:46+5:30

Navi Mumbai : लेवा पाटीदार सभागृहातील कोरोना उपचार केंद्रामध्ये ३०० रुग्ण उपचार घेत आहेत. प्राथमिक लक्षणे असणाऱ्यावर येथे उपचार सुरू आहेत.

A fire broke out at the Corona Treatment Center in Airoli | ऐरोलीत कोरोना उपचार केंद्रामध्ये लागली आग, कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा धोका टळला

ऐरोलीत कोरोना उपचार केंद्रामध्ये लागली आग, कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा धोका टळला

Next

नवी मुंबई: ऐरोली सेक्टर १५ मधील लेवा पाटीदार सभागृहातील कोरोना उपचार केंद्रामध्ये शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आग लागली. मनपाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ आग विझविल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. रात्री उशीरापर्यंत विद्यूतव्यवस्था सुरळीत करण्याचे काम सुरू होते.
लेवा पाटीदार सभागृहातील कोरोना उपचार केंद्रामध्ये ३०० रुग्ण उपचार घेत आहेत. प्राथमिक लक्षणे असणाऱ्यावर येथे उपचार सुरू आहेत. रात्री आठ वाजता अचानक शाॅकसर्कीटमुळे येथे आग लागली. महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी तत्काळ आग विझवली. कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पुढील धोका टळला. ऐरोली अग्निशमन दलाचे पथकही तत्काळ घटनास्थळी पोहचले. रात्री उशीरापर्यंत रूग्णालयातील विद्युतपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते. 
आगीच्या घटनेमुळे रात्री उशिरापर्यंत तिथला विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही. यामुळे तिथे विलगीकरण करण्यात आलेल्या कोरोना बाधितांना अडचणीला सामोरे जावे लागले. कर्मचाऱ्यांनी तत्काळ आग विझवल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

Web Title: A fire broke out at the Corona Treatment Center in Airoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.