Nerul Meridian Fire Video : मॅरेडियन टॉवरमध्ये आग, चीनी युवकांचे पासपोर्ट अन् कागदोपत्रे जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 12:53 AM2019-01-11T00:53:23+5:302019-01-11T02:16:37+5:30
Breaking News by Lokmat : Nerul Meridian Fire Nerul Meridian Fire : शहरातील नेरुळ सेक्टर 6 येथे पामबीचरोडवरील मॅरेडियन टॉवरमध्ये अचानक आग लागली आहे.
Breaking News by Lokmat : Nerul Meridian Fire
नवी मुंबई - शहरातील नेरुळ सेक्टर 6 येथे पामबीच रोडवरील मेरेडीअन टॉवरमध्ये अचानक आग लागली. या टॉवरमधील 14 व्या मजल्यावर ही आग भडकली असून अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमनच्या जवानांनी आग आटोक्यात आणली असून सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही इजा झाली नाही. मात्र, फ्लॅटमधील सामान जळून खाक झाले आहे. याबाबतचे वृत्त सर्वात आधी लोकमतने दिले आहे.
नेरुळच्या पामबीच रोडवरील मॅरेडियन टॉवरमधील 14 व्या मजल्यावर रात्री 10.45 वाजता अचानक आग भडकली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, सुरुवातीला आलेल्या दोन गाड्यांमध्ये हायड्रोक्लिक शिडी नसल्याने आग विझविण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला. अखेर, तिसऱ्या गाडीत हायड्रोक्लिक शिडी (क्रेन) आल्यानंतर इतर टँकरच्या सहाय्याने पाण्याचा उंच मारा करुन ही आग आटोक्यात आणण्यात आली.
मॅरेडियन टॉवरच्या 14 व्या मजल्यावरील आग लागलेला हा फ्लॅट दोन चीनी युवकांना भाड्याने देण्यात आला आहे. सुदैवाने आग लागली तेव्हा फ्लॅटमध्ये कुणीही नव्हते. सध्या, या फ्लॅटमध्ये दोन चायनीज युवक राहात असून ते जवळच राहणाऱ्या आपल्या मित्रांकडे जेवणासाठी गेले होते. त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. सुरुवातीला आग भडकल्यानंतर जवळपास एक ते दीड तास फ्लॅटमध्ये आग भडकली. त्यामुळे फ्लॅटमधील सामान जळून खाक झाले आहे. विशेष म्हणजे, फ्लॅटमधील या दोन चीनी युवकांचे पासपोर्ट, व्हिसा आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांचीही राख झाली आहे. दरम्यान, पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली असून रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरुच होते.
पाहा व्हिडीओ -