आरोग्यसह अग्निशमन विभाग सक्षम होणार; अग्निशमन जवानांचा ताण कमी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 05:27 AM2018-09-05T05:27:26+5:302018-09-05T05:27:50+5:30

आरोग्य व अग्निशमन विभाग सक्षम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या विभागामध्ये ४४८ पदांची भरती केली जाणार आहे.

 Fire Department with Health enabled; The fire of firefighters will be reduced | आरोग्यसह अग्निशमन विभाग सक्षम होणार; अग्निशमन जवानांचा ताण कमी होणार

आरोग्यसह अग्निशमन विभाग सक्षम होणार; अग्निशमन जवानांचा ताण कमी होणार

Next

नवी मुंबई : आरोग्य व अग्निशमन विभाग सक्षम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या विभागामध्ये ४४८ पदांची भरती केली जाणार आहे. यामुळे सद्यस्थितीमध्ये या विभागामधील कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होणार असून, जादा मनुष्यबळामुळे शहरवासीयांना चांगल्या सुविधा देणे शक्य होणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेमध्ये आरोग्य विभागावर वारंवार टीका होत असते. मनुष्यबळ कमी असल्यामुळे ऐरोली, नेरुळ रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करता आलेले नाही. नागरिकांना चांगल्या सुविधा देता येत नाहीत. अग्निशमन दलामध्येही कर्मचारी कमी असल्यामुळे उपलब्ध जवानांवरील ताण वाढला होता. अनेक कर्मचाºयांना जादा वेळ काम करावे लागत होते. आयुक्त रामास्वामी एन. यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम पालिकेचा आकृतिबंध शासनाकडून मंजूर करून घेतला. आरोग्य विभागाकडून कॉलेज आॅफ फिजिशिअन अ‍ॅण्ड सर्जन पदवी व पदविका अभ्यासक्र म सुरू केला आहे. यामधून महानगरपालिकेस ४० हून अधिक डॉक्टर्स उपलब्ध झालेले असून, या नियोजित भरतीद्वारे इतर आवश्यक वैद्यकीय कर्मचारी महानगरपालिकेस उपलब्ध होऊन ही रु ग्णालये सक्षमपणे रु ग्णसेवा पुरविणार आहेत. अग्निशमन अधिकारी व कर्मचाºयांना जादा कामासाठीचा भत्ता वाढवून दिला आहे. कर्मचारी भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. दोन्ही विभागांत तब्बल ४४८ पदे भरली जाणार आहेत. भरतीविषयी माहिती महापरीक्षा पोर्टल व नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ५ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०१८ पर्यंत अर्ज भरता येणार आहेत. १३ ते १६ आॅक्टोबरच्या दरम्यान परीक्षा होणार आहेत.
कर्मचारी भरतीमुळे अग्निशमन विभाग सक्षम होणार आहे. महापालिका कोपरखैरणेमध्ये नवीन केंद्र सुरू करणार आहे; परंतु कर्मचारी नसल्यामुळे ते सुरू करता आले नव्हते. शहराची लोकसंख्या १४ लाखांवर पोहोचली आहे. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह अनेक महत्त्वाची कार्यालये मनपा क्षेत्रामध्ये आहेत. आग लागण्याच्या घटनांमध्येही वाढ होऊ लागली आहे. संपूर्ण मनपा क्षेत्राचा भार फक्त १३९ अधिकारी व कर्मचाºयांवर अवलंबून आहे. महापालिका २६० पदांची भरती करणार असल्यामुळे अधिकारी व कर्मचाºयांची संख्या पूर्वीपेक्षा अडीचपट वाढणार आहे.

भूलथापांना बळी पडू नका
महापालिकेच्या वतीने प्रथमच संपूर्ण भरती प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. आॅनलाइन परीक्षा पद्धतीमुळे संपूर्ण भरती प्रक्रिया असल्यामुळे त्यामध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही. पूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार असून, नोकरी लावण्याचे आमिष दाखविणाºयांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Web Title:  Fire Department with Health enabled; The fire of firefighters will be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.