सिडकोच्या जागेवर ठेवण्यात आलेल्या भंगाराला आग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 03:42 AM2018-12-29T03:42:53+5:302018-12-29T03:43:07+5:30
द्रोणागिरी नोड परिसरातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील सिडकोच्या जागेवर टाकण्यात येत असलेला कचरा आणि ठेवण्यात आलेल्या सामनाला गुरुवारी अचानक आग लागली.
उरण : द्रोणागिरी नोड परिसरातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील सिडकोच्या जागेवर टाकण्यात येत असलेला कचरा आणि ठेवण्यात आलेल्या सामनाला गुरुवारी अचानक आग लागली. या आगीत भंगार, केरकचरा, डांबराचे ड्रम जळून खाक झाले. भेंडखळ गावातील रहिवाशांनी या आगीची खबर अग्निशामक दलाला दिली असता, अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून तत्काळ आग आटोक्यात आणली.
द्रोणागिरी नोड येथील सिडकोचे अधिकारी हे या परिसरातील गावामधील गाव पुढाऱ्यांना हाताशी धरून सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर परप्रांतीय नागरिकांना भंगार, टपºयांचा व्यवसाय करण्यासाठी महिना पाच ते दहा हजार रुपये भाडेतत्त्वावर जागा देतात, त्यामुळे हे परप्रांतीय नागरिक त्या जागेवर प्लॅस्टिक पिशव्या, लाकूड फाटा, टायर, लोखंड आणि ज्वलनशील घातक पदार्थ साठवून ठेवतात. तसेच टपरीधारक, टायरचे व्यावसायिक रस्त्यावर आपले बस्तान मांडतात. सिडकोच्या भूखंडावर लागलेली आग ही रात्रीच्या वेळी लागली असती, तर रस्त्यावर उभ्या राहणा-या आॅइलच्या गाड्या आणि जवळच असणाºया भारत गॅस, पेट्रोल पंप यांच्यापर्यंत पोहोचली असती, तर अनर्थ घडला असता.
भेंडखळ गावातील रहिवाशांच्या जीवितासही धोका निर्माण झाला असता, तरी उरण तालुक्यात अग्नितांडव निर्माण करू पाहणाºया अशा परप्रांतीय भंगार व्यावसायिकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भेंडखळ गावातील रहिवाशांकडून केली जात आहे.