नवी मुंबई : ऐरोली सेक्टर ३मधील फॅशन ब्युटी दुकानाला गुरुवारी पहाटे आग लागली. आगीत मंजू अमरराम चौधरी (२५) व गायत्री चौधरी (५) या मायलेकीचा गुदमरून मृत्यू झाला असून, चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.जखमींमध्ये अमरराम चौधरी, छगाराम चौधरी, अंजली व दुर्गेश चौधरी यांचा समावेश आहे. चौधरी कुटुंबीय जवळपास १० वर्षांपासून फॅशन ब्युटी नावाचे दुकान चालवत आहेत. सौंदर्य प्रसाधने, भेटवस्तू व इतर साहित्याची विक्री करण्याचा व्यवसाय करत होते. दुकानाच्या वरील मजल्यावर हे कुटुंबीय वास्तव्य करत होते. वरील मजल्यावरील घरात जाण्यासाठीचा रस्ताही दुकानामधूनच होता. गुरुवारी पहाटे ४ वाजता शॉर्टसर्किटमुळे दुकानाला आग लागली. दुकानात काम करणारा छगाराम चौधरी याने मालक अमरराम चौधरी यांना याविषयी माहिती दिली. दुकानात धूर पसरला असल्यामुळे शटरची चावी सापडली नाही. यामुळे छगाराम यांनी वरील मजल्यावरील खिडकीतून खाली उडी मारली. अमरराम व त्यांची पत्नी मंजू यांनी दोन मुलांना वरील मजल्यावरून खाली सुरक्षितपणे उतरविले. तिसºया मुलीला आणण्यासाठी मंजू घरामध्ये गेल्या; परंतु धुरामुळे गुदमरून तिचा व मुलीचाही मृत्यू झाला.आगीचे वृत्त समजताच ऐरोली अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आग नियंत्रणात आणली व दोन्ही मृतदेहही बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत होती. ऐरोली परिसरातील व्यापाºयांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली होती. या घटनेविषयी रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.मृत्यूपूर्वी दोन मुलींचा जीव वाचविलाआग लागल्यामुळे घरात व दुकानामध्ये प्रचंड धूर झाला. शटर उघडण्यासाठी चावीही सापडली नाही. मुलांनी रडण्यास सुरुवात केली. मंजू व त्यांचे पती अमरराम यांनी प्रसंगावधान राखून दोन वर्षांची मुलगी अंजली व एक वर्षाचा मुलगा दुर्गेशला सुखरूप बाहेर काढले. घरात अडकलेली मोठी मुलगी गायत्री हिला त्या बाहेर काढू शकल्या नाहीत.
ऐरोलीमधील फॅशन ब्युटी दुकानाला आग, मायलेकीचा मृत्यू, चार जण किरकोळ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 1:54 AM