उरणमधील कंटेनर यार्डला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 05:41 AM2018-12-04T05:41:52+5:302018-12-04T05:41:58+5:30
चिर्ले ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या वैष्णवी लॉजिस्टिक कंटेनर यार्डला सोमवारी भीषण आग कंटेनर यार्डात ठेवलेल्या अतिज्वलनशील हजरडस्टच्या कंटेनरला लाग लागल्याने ती बाजूला असलेल्या टायरच्या कंटेनरमध्येही पसरली.
उरण : चिर्ले ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या वैष्णवी लॉजिस्टिक कंटेनर यार्डला सोमवारी भीषण आग कंटेनर यार्डात ठेवलेल्या अतिज्वलनशील हजरडस्टच्या कंटेनरला लाग लागल्याने ती बाजूला असलेल्या टायरच्या कंटेनरमध्येही पसरली.
हजरडस्ट आणि टायरचे मिळून १६ कंटेनर जळून खाक झाले आहेत. यात एक जण होरपळला आहे. अग्निशमन दलाच्या १२ बंबांच्या मदतीने ५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आल्याची माहिती उरण तहसीलदार कल्पना गोडे यांनी दिली.
आग लागल्यानंतर वेळीच योग्य खबरदारी न घेतल्याने तिने उग्र रूप धारण केले. यार्डमध्ये परवानगीशिवाय जास्त केमिकल व इतर वस्तूंचा साठा केला असल्याची माहितीही समोर येत आहे. या वेळी नेमका नुकसानीचा आकडा अद्याप समजू शकलेला नाही. आगीमुळे स्फोट झाला असता तर चिर्ले गावासह वैष्णवी लॉजिस्टिक कंटेनर यार्डला लागून असलेले कंटेनर यार्डही बेचिराख झाले असते अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केलीे.
कंटेनर यार्डना थेट मंत्रालयातून परवानगी दिली जात असल्याने जिल्हाधिकारीही काही करू शकत नसल्याची प्रतिक्रियाही ग्रामस्थांनी यावेळी दिली.