सानपाडा डिमार्ट जवळ गोळीबार, एकजण जखमी, बाईवरुन दोघे फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 12:00 IST2025-01-03T11:57:04+5:302025-01-03T12:00:08+5:30
सानपाडा येथील डिमार्ट जवळ सकाळी अचानक गोळीबार सुरू झाला. यात एकजण जखमी झाला आहे.

सानपाडा डिमार्ट जवळ गोळीबार, एकजण जखमी, बाईवरुन दोघे फरार
नवी मुंबईतील सानपाडा येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. सानपाडा येथील डिमार्ट जवळ दोन जणांनी अचानक गोळीबार सुरू केला. या घटनेत एकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अज्ञात आरोपीकडून पाच ते सहा राउंड फायर करण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेली माहिती अशी, नवी मुंबईतील सानपाडा येथील डिमार्ट जवळ असलेल्या गर्दीत गोळीबार करण्यात आला. यामध्ये एका व्यक्तीने पाच ते सहा राउंड फायर केले. यानंतर तो व्यक्ती त्याच्या साथीदारासोबत बाईकवरुन फरार झाला.
या गोळीबारामध्ये एक व्यक्ती जखमी झाला. जखमी झालेल्या व्यक्तीवर दोन ते तीन गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सदरील जखमी व्यक्तीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.