जादूटोणाविरोधी पहिला कक्ष ठाणे शहरात सुरु
By admin | Published: July 18, 2015 11:44 PM2015-07-18T23:44:02+5:302015-07-18T23:44:02+5:30
राज्यात जादूटोणाविरोधी क ायद्याची अंमलबजावणी अधिक सक्रियतेने करण्यासाठी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि अधीक्षक क ार्यक्षेत्रात तत्काळ याबाबत विशेष
ठाणे : राज्यात जादूटोणाविरोधी क ायद्याची अंमलबजावणी अधिक सक्रियतेने करण्यासाठी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि अधीक्षक क ार्यक्षेत्रात तत्काळ याबाबत विशेष कक्ष स्थापन करण्याचा निर्णय राज्य गृह विभागाने घेतला आहे. त्यानुसार, अशा प्रकारे जिल्ह्यात पहिला जादूटोणाविरोधी कक्ष सुरू करण्याचा मान ठाणे शहर पोलिसांनी मिळविला आहे.
३१ मे रोजी याबाबत अध्यादेश जारी करण्यात आला. त्यानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण कक्षातील पोलीस निरीक्षक या कक्षाचा नियंत्रण अधिकारी असणार आहे. हा कक्ष सुरू झाल्यावर त्याबाबत कक्षाची पाटी लावून त्यावर नियंत्रण अधिकाऱ्याचे नाव, कक्षाचा दूरध्वनी आणि संबंधित अधिकाऱ्याचा भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करण्याबाबत स्पष्ट नमूद के ले आहे. दक्षता अधिकारी म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षकाची नेमणूक करण्यात येणार आहे. या कायद्याबाबत जनजागृती, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या कक्षाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
यानुसार, ठाणे शहर पोलिसांनी कक्षाची स्थापना करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून शकील शेख यांची नियुक्ती केली आहे. यासंदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी २५४४३७९८ आणि ९६३७८०४५६३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन
ठाणे पोलिसांनी केले आहे. (प्रतिनिधी)