‘धर्माधिकारीं’चा कॅम्प राज्यात प्रथम
By admin | Published: January 6, 2017 05:57 AM2017-01-06T05:57:26+5:302017-01-06T05:57:26+5:30
राज्यात विविध प्रकारचे कॅम्प सेवाभावी संस्था व अन्य मार्गातून आयोजित केले जातात, काही फक्त शो बाजी करतात; परंतु डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी
अलिबाग : राज्यात विविध प्रकारचे कॅम्प सेवाभावी संस्था व अन्य मार्गातून आयोजित केले जातात, काही फक्त शो बाजी करतात; परंतु डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने आज पाहता म्हसळा तालुक्यात गावोगावी पोहोचून सामान्यातील सामान्य नागरिकांना माहिती देऊन आज प्रत्यक्षात २०००पेक्षा जास्त जातीचे दाखले प्रस्ताव सादर करण्याचे राज्यात पहिले काम केल्याचे सांगितले. प्रतिष्ठानचे हे कार्य आज प्रत्येक तालुक्याने आदर्श घेण्याचे काम आहे. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी अगदी नियोजनबद्ध कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ न करता, या उपक्र माचे नियोजन केले, असे प्रतिपादनतहसीलदार विरिसंग वसावे यांनी के ले.
म्हसळा तालुक्यात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने व म्हसळा तालुका तहसील कार्यालय यांच्या सहकार्याने संपूर्ण तालुक्यात २३ डिसेंबर ते ४ जानेवारी, २०१७ रोजीपर्यंत एकूण १५ ठिकाणी कॅम्प आयोजित करण्यात आले होते. ४ जानेवारीच्या संपूर्ण म्हसळा तलाठी सजा व इतर गावातील ज्यांना त्यांच्या कॅम्पच्या ठिकाणी येता आले, त्यांनी म्हसळा कॅम्प ठिकाणी येऊन आपले प्रस्ताव दाखल केले. बुधवारी कॅम्पच्या दिवशी ८१० दाखले प्रस्ताव स्वीकृती केले. या वेळी तहसीलदार वसावे बोलत होते.
विरिसंग वसावे म्हणाले की, ‘माझ्या म्हसळा तालुक्यात प्रतिष्ठानचे विविध उपक्र म आयोजित केले आहेत. विशेष म्हणजे, स्वच्छता मोहीम, वृक्ष लागवड व संवर्धन यासारखे उपक्र म राबवल्याने आमच्या शासनाचे काम हलके झाले आहे.
शासनामार्फत विविध प्रकारे लोकांना प्रबोधन केले जाते; परंतु ते अपुरे राहिले जाते. श्री बैठकीतून एकदा सांगितले की, ते काम निस्वार्थपणाने पूर्णत्वास नेलेले दिसते.