पुणे-नाशिक देशातील पहिला हायस्पीड मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 12:09 AM2019-03-06T00:09:39+5:302019-03-06T00:09:47+5:30
पुणे-नाशिक रेल्वे मार्ग हा देशातील पहिला हायस्पीड रेल्वे मार्ग होणार आहे.
नवी मुंबई : पुणे-नाशिक रेल्वे मार्ग हा देशातील पहिला हायस्पीड रेल्वे मार्ग होणार आहे. या मार्गावर ताशी २२० कि.मी. वेगाने रेल्वे धावणार आहे. त्यामुळे दोन्ही शहरातील अंतर केवळ दोन तासांत पूर्ण करता येणार असल्याची शक्यता खासदार शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केली.
वाशीत सोमवारी शिरूर लोकसभा मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई रहिवासी संघाच्या वतीने आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, नवी मुंबई जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे, शिरूरचे जिल्हाप्रमुख राम गावडे आदी उपस्थित होते.
कार्यक्र माच्या प्रारंभी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पाटील म्हणाले, अभियांत्रिकी सर्वेक्षण सुरू असतानाच हा प्रकल्प पूर्णपणे महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे हस्तांतरित करण्यात आला.
प्रकल्प हस्तांतरित झाल्यानंतर पुणे-नाशिक रेल्वे मार्गाची नव्याने आखणी सुरू करण्यात आली. त्यानुसार आधीच्या मार्गात बदल करून नवीन मार्गाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.