पनवेल : सध्या घनकचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न शहरांना भेडसावत आहे. त्यामुळे कचºयाचे जागीच विघटन करणे काळाची गरज आहे. पनवेल महापालिकेनेही याकरिता ओल्या व सुक्या कचºयाचे वर्गीकरण करण्याची सक्ती केली आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात जनजागृतीदेखील केली जात आहे. अनेक सोसायट्यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. खारघरमधील केशर हार्मोनी गृहनिर्माण सोसायटीने शून्य कचरा हा उपक्र म हाती घेऊन सेंद्रिय खत प्रकल्प सुरू केला आहे. उपक्रमाचे उद्घाटन पालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी स्थानिक नगरसेविका लीना गरड, छाया तारळेकर, सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.कचºयापासून खतनिर्मिती करणारी पनवेल शहरातील ही एकमेव सोसायटी आहे. २३४ फ्लॅट्सच्या या सोसायटीत दररोज १६० किलो एवढा कचरा निघतो. या कचºयावर योग्य प्रक्रि या करून त्याच्यातून सेंद्रिय खतनिर्मिती केली जाणार आहे. आयुक्त शिंदे यांनी सोसायटीला विशेष प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे सांगितले. महापालिका क्षेत्रातील १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्मिती करणाºया सोसायटीला कचरा वर्गीकरण सक्तीचे केले आहे. या उपक्र माविषयी स्थानिक नगरसेविका लीना गरड याही प्रभागात जनजागृतीचे काम करीत होत्या. दीड महिन्यांपूर्वी डॉ. शिंदे, छाया तारळेकर, लीना गरड आणि सोसायटीच्या सदस्यांसमवेत बैठक घेऊन अधिक माहिती दिली होती. या मार्गदर्शनातून सोसायटीच्या पदाधिकाºयांनी तीन लाख रु पये खर्च करून, सोसायटीने शून्य कचरा, सेंद्रिय खत निर्माण प्रकल्प सुरू केला आहे. या वेळी आयुक्त शिंदे यांनी उपस्थित नागरिकांना ओला आणि सुका कचरा कोणता? त्यांचे वर्गीकरण करून ठेवण्यासाठी दोन डब्यांचा वापर करावा, असा सल्ला दिला. सोसायटीच्या आवारातच हा उपक्र म सुरू करण्यात आला आहे. या सोसायटीत एकूण २३४ फ्लॅट असून, रोज जवळपास १२० किलो ओला, तर ४० किलो सुका कचरा जमा होतो.
सेंद्रिय खतनिर्मिती करणारी ‘हार्मोनी’ पहिली सोसायटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 2:07 AM