माथाडी कामगार नेते अविनाश रामिष्टेंवर गोळीबार
By admin | Published: November 16, 2016 05:42 PM2016-11-16T17:42:37+5:302016-11-16T17:42:37+5:30
अखिल भारतीय माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस अविनाश रामिष्टे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार करण्यात आला. ही घटना रायगड जिल्ह्यातील पेण
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - अखिल भारतीय माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस अविनाश रामिष्टे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार करण्यात आला. ही घटना रायगड जिल्ह्यातील पेण – खोपोली मार्गावरील सापोलीजवळील एका हॉटेलबाहेर मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घटली. या घटनेत अंगरक्षकाच्या सतर्कतेमुळे अविनाश रामिष्टे या हल्ल्यातून बचावले.
अविनाश रामिष्टे नागोठणे येथील सुप्रीम पेट्रोकेमिकल कंपनीमधील कार्यक्रम आटोपून परतत होते. त्यावेळी पेण-खोपोली रस्त्यावर हॉटेल योगीराजमध्ये ते जेवणासाठी थांबले होते. जेवण संपवून ते आपल्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. मात्र अंगरक्षक सतर्क असल्यामुळे त्याने अविनाश रामिष्टे यांना बाजूला केल्याने गोळी गाडीच्या समोरील काचेतून आरपार निघून गेली. या घटनेत अविनाश रामिष्टे थोडक्यात बचावले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. दरम्यान, या प्रकरणाची पोलीसांकडून चौकशी सुरु आहे.