पनवेलमध्ये मच्छीमारांचे उपोषण
By admin | Published: May 11, 2016 02:14 AM2016-05-11T02:14:36+5:302016-05-11T02:14:36+5:30
समुद्रातील प्रचंड भरावामुळे करंजा-खोपटे खाडीलगत चॅनेलमध्ये मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
पनवेल : समुद्रातील प्रचंड भरावामुळे करंजा-खोपटे खाडीलगत चॅनेलमध्ये मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे स्थानिक मच्छीमार करंजा टर्मिनल्स अँड लॉजिस्टिक कंपनीविरोधात मंगळवारपासून प्रांत कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.
करंजा टर्मिनल्स अँड लॉजिस्टिकमुळे मासेमारी करण्याकरिता गोवठणे, आवरे, खोपटा, कोप्रोली आणि मोठी जुई येथील मच्छीमारांना अडचणी येत आहेत. यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत कंपनी व्यवस्थापनाकडून नुकसानभरपाई देण्यासंदर्भात आश्वासन देण्यात आले होते, मात्र त्याची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे करंजा-खोपटा खाडीतील पारंपरिक मच्छीमार संघटनेच्या वतीने मंगळवारपासून उपोषण सुरू के ले.