न्हावाशेवा–शिवडी सी-लिंक प्रकल्पबाधित मच्छीमारांच्या खात्यात एकरकमी साडेपाच कोटी नुकसानभरपाई जमा
By नारायण जाधव | Published: October 9, 2023 03:31 PM2023-10-09T15:31:06+5:302023-10-09T15:33:19+5:30
नवी मुंबई :- “एमएमआरडीए” तर्फे उभारण्यात येत असलेल्या बहुचर्चित न्हावाशेवा- शिवडी सी-लिंक प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नवी मुंबईतील दिवाळे, बेलापूर, ...
नवी मुंबई :- “एमएमआरडीए” तर्फे उभारण्यात येत असलेल्या बहुचर्चित न्हावाशेवा- शिवडी सी-लिंक प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नवी मुंबईतील दिवाळे, बेलापूर, सारसोळे, वाशी, ऐरोली येथील मच्छीमार बांधवांना बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाईची एक रकमी रक्कम रु. 5 कोटी 56 लाख थेट त्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. त्याच अनुषंगाने सोमवारी न्हावाशेवा-शिवडी सी-लिंक प्रकल्पबाधित मच्छीमार बांधवांनी सीबीडी येथील वारकरी भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन केले. तसेच कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन फगेवाले मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष अनंता बोस यांच्यासहित सर्व मच्छीमार अध्यक्ष तसेच उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, यासंदर्भात एमएमआरडीएने केलेल्या सर्वेक्षणानुसार पात्र झालेल्या मच्छीमार बांधवांना नुकसानभरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे. तसेच पहिला हप्ता प्राप्त झालेल्या (83) मच्छीमार बांधवाला दुसरा हप्ता म्हणून रु. 1,34,000/- व नव्याने पात्र झालेल्या (132) मच्छीमार बांधवाला पहिला व दुसरा हप्ता म्हणून रु. 3,37,000/- नुकसान भरपाई मिळाली आहे. सद्यस्थितीत दिवाळे, बेलापूर, करावे, सारसोळे, वाशी, ऐरोली अश्या एकूण 215 मच्छीमार बांधवाना पहिला हप्ता व दुसरा हप्ता अशी एकूणच सर्वांना एक रकमी नुकसान भरपाई रु 5 कोटी 56 लाख डी.बी.टी. द्वारे थेट प्रकल्पबाधित मच्छीमार बांधवांच्या बँक खात्यात जमा झाली आहे.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, उर्वरित ज्या मच्छीमार बांधवांची कागदपत्रांच्या अभावी सदरची प्रक्रिया अपूर्ण आहे ती लवकरात लवकर कागदपत्रांची पडताळणी करून उर्वरित मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळवून देणार. कोणताही कोळी बांधव हा या नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही असे त्यांनी सांगितले. न्हावाशेवा शिवडी सी-लिंक प्रकल्पबाधित नवी मुंबईतील मच्छीमार बांधवांना नुकसानभरपाई मिळावी याकरिता मी गेली 4 वर्षे शासन दरबारी पाठपुरावा करीत होती.
वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे सहकार भारती यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय मत्स्य संमेलनास केंद्रीय मत्स्यपालन मंत्री माननीय पुरुषोत्तमजी रुपाला यांनी शेतकऱ्यांप्रमाणे कर्जाची योजना मत्स्य व्यवसायाशी निगडीत लोकांना देणार असल्याचे सांगून मच्छीमारांना “किसान क्रेडीट कार्ड” देण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले. यामधूनच 7 टक्के व्याजदराने 1 लाख 60 हजार रुपयांची रक्कम सहज उपलब्ध होणार असून वेळेत कर्जाची परतफेड केल्यास 3 टक्के व्याज सरकार भरणार असे म्हणाले.
कार्यक्रमाप्रसंगी कोळी महासंघाचे अध्यक्ष तथा आमदार रमेशदादा पाटील, माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, डॉ. राजेश पाटील, बलबीर सिंग यांनी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी न्हावाशेवा-शिवडी सी-लिंक बाधित मच्छीमार बांधवानसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आमदार मंदाताई म्हात्रे यांचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. तसेच आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नाने न्हावाशेवा- शिवडी सी-लिंक प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमार बांधवांना “दिवाळी भेट” म्हणून नुकसान भरपाई मिळाली असून त्यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
खांदेवाले मच्छीमार संस्था, फगेवाले मच्छीमार संस्था, डोलकर मच्छीमार संस्था, एकविरा मच्छीमार विक्रेता संघ, सारसोळे ग्रामस्थ मंडळ व ऐरोली ग्रामस्थ यांच्या वतीने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांना पुष्पहार घालून “जाहीर सत्कार” करण्यात आले. यावेळी विधानपरिषेदेचे आमदार तथा कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी नगरसेवक निलेश पतील, माजी नगरसेवक दिपक पवार, माजी नगरसेवक सुनील पाटील, माजी नगरसेवक भरत जाधव, माजी नगरसेवक अशोक गुरुखे, डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, दत्ता घंगाळे, पांडुरंग आमले, जग्गनाथ जगताप, मुकुंद विश्वासराव, गोपाळराव गायकवाड, बलबीर सिंग, राजेश रॉय, प्रभाकर कांबळे, संदेश पाटील, मोहन मुकादम, संजय ओबेरॉय, शशी नायर, निलेश वर्पे, राजेश पाटील, आरती राउळ, चैताली ठाकूर, किरण वर्मा, शीतल जगदाळे, जयश्री चित्रे, डोहाळे मॅडम, बंडू मोरे, रवी ठाकूर, नांजी भाई, ममता सिंग, डोलकर मच्छीमार संस्थेचे उपाध्यक्ष तुकाराम कोळी, खांदेवाले मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष नीलकंठ कोळी, फगेवाले मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष अनंता बोस, एकविरा महिला विक्रेता संघाचे अध्यक्षा सुरेखा कोळी, ज्ञानेश्वर कोळी, व असंख्य कोळी बांधव व महिला उपस्थित होत्या.