सट्टा लावणाऱ्या पाच जणांना अटक, मध्यवर्ती शाखेच्या पथकाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 03:32 IST2018-04-01T01:22:04+5:302018-04-01T03:32:01+5:30
क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणा-या पाच जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. त्यांनी बेलापूरमधील हॉटेलमधून आॅनलाइन सट्टा लावला होता. याची माहिती मिळताच मध्यवर्ती शाखेच्या पथकाने छापा टाकून त्यांना अटक केली आहे.

सट्टा लावणाऱ्या पाच जणांना अटक, मध्यवर्ती शाखेच्या पथकाची कारवाई
नवी मुंबई : क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणा-या पाच जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. त्यांनी बेलापूरमधील हॉटेलमधून आॅनलाइन सट्टा लावला होता. याची माहिती मिळताच मध्यवर्ती शाखेच्या पथकाने छापा टाकून त्यांना अटक केली आहे.
बेलापूर येथील हॉटेलमधून क्रिकेटवर सट्टा लावला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाचे सहायक उपनिरीक्षक संजय पवार यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सदर हॉटेलमधील संशयित खोलीवर छापा टाकला असता, हा सट्टा उघड झाला. त्या ठिकाणावरून मेहुल शांतीलाल चौहान (३४), भावेश राजेंद्र शाह (३७) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३२ हजार रुपये रोख, लॅपटॉप व पाच मोबाइल असे साहित्य जप्त करण्यात आले.
तर अधिक चौकशीतून त्यांच्या इतर तीन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. पंकज कांजीभाई बाबर (३१), सचिन रंचोडदास ठक्कर (३९) व जितेश महेश गोस्वामी (३१) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात सीबीडी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.