एटीएसकडून पाच बांगलादेशींना अटक, चार आरोपींकडे सापडले आधारकार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 02:44 AM2018-03-15T02:44:24+5:302018-03-15T02:44:24+5:30
दहशतवाद विरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटने पनवेलमध्ये धाड टाकून पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.
पनवेल : दहशतवाद विरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटने पनवेलमध्ये धाड टाकून पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. जुई गावात या नागरिकांनी आश्रय घेतला होता. पोलिसांनी अटक केलेल्या पाचपैकी चार आरोपींकडे आधारकार्ड असल्याचेही निदर्शनास आले आहे.
नवी मुंबई परिसरामध्ये अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची संख्याही वाढत आहे. बांधकाम व इतर ठिकाणी बांगलादेशी वास्तव्य करत आहेत. अशाप्रकारे विनापरवाना वास्तव्य करणाºया व देशाच्या सुरक्षेला धोका पोहचविणाºयांवर एटीएस लक्ष ठेवून असते. पनवेल परिसरामध्ये बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याची माहिती एटीएसच्या नवी मुंबई युनिटला मिळाली होती. १३ मार्चला विशेष पथकाने जुई गाव परिसरामध्ये छापा टाकला. त्या ठिकाणी पाच बांगलादेशी नागरिक आढळून आले. सर्व आरोपींवर विदेशी नागरिक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या सर्व आरोपींची कसून चौकशी केली जात असून ते येथे कसे आले व का आले याविषयी तपास केला जात आहे.