कळंबोली येथून पाच मुले बेपत्ता, धक्कादायक माहिती समोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2024 02:13 PM2024-05-07T14:13:25+5:302024-05-07T14:14:07+5:30
कळंबोली पोलीस ठाणे हद्दीतून पाच मुले बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मयुर तांबडे, नवी मुंबई : कळंबोली पोलीस ठाणे हद्दीतून पाच मुले बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील तीन मुले सापडले असून दोन मुले अद्यापही बेपत्ता आहेत.
कळंबोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खिडुकपाडा-कातकरवाडी येथील 18 वर्षे वयोगटाच्या आतील चार मुली आणि एक मुलगा हे घरातून कोणाला काही न सांगता निघून गेले. याबाबतची तक्रार सोमवारी कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली पोलिसांचे दोन-तीन पथक तयार करण्यात आले. ही मुले करंजाडे येथील मामाच्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता त्यावेळी तीन मुले सापडून आली तर दोघेजण पळून गेले. यापूर्वी देखील ही मुले घर सोडून गेली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.