पनवेल महापालिकेच्या नऊपैकी पाच महासभा तहकूब, वेळेसह पैशाचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 06:59 AM2018-04-06T06:59:31+5:302018-04-06T06:59:31+5:30

पनवेल महानगरपालिकेची स्थापना होऊन दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. निवडणुका पार पडल्यानंतर नगरसेवकांच्या कार्यकाळाला दहा महिने पूर्ण झाले आहेत. अद्याप नऊ महासभा पार पडल्या आहेत.

 Five General Elections in Panvel Municipal Corporation, time wastage of money | पनवेल महापालिकेच्या नऊपैकी पाच महासभा तहकूब, वेळेसह पैशाचा अपव्यय

पनवेल महापालिकेच्या नऊपैकी पाच महासभा तहकूब, वेळेसह पैशाचा अपव्यय

Next

- वैभव गायकर
पनवेल  - पनवेल महानगरपालिकेची स्थापना होऊन दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. निवडणुका पार पडल्यानंतर नगरसेवकांच्या कार्यकाळाला दहा महिने पूर्ण झाले आहेत. अद्याप नऊ महासभा पार पडल्या आहेत. मात्र, या महासभेत कामकाज चालण्याऐवजी विविध कारणांनी सभा तहकूब होण्याचे प्रमाणच जास्त असल्याचे दिसून येत आहे. आजपर्यंत पार पडणाऱ्या नऊ महासभांपैकी पाच सभा तहकूब करण्यात आल्या आहेत.
पनवेल महानगरपालिकेला स्वंतत्र असे सभागृह नसल्याने पालिकेच्या मासिक महासभा येथील फडके नाट्यगृहात पार पडत असतात. विशेष म्हणजे, या नाट्यगृहात विविध नाटकांचे प्रयोग सादर केले जात असल्याने या ठिकाणी महासभेचे आयोजन करण्यापूर्वी नाटकांच्या बुकिंगची माहिती पालिकेला घ्यावी लागते. काही वेळेला नाटकांच्या प्रयोगामुळे महासभेच्या तारखाच रद्द करण्याचे प्रकार या ठिकाणी घडले आहेत. अशा वेळी सभा तहकूब करण्याचे प्रकार वाढत असतील तर यामुळे पालिकेसह लोकप्रतिनिधींचेही मोठे नुकसान होत आहे. सभेचे कामकाम पूर्ण दिवसभर चालत असल्याने त्या दिवशी कोणत्याही नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन पालिकेला करता येत नाही. विशेष म्हणजे, या दिवशी सर्व नगरसेवक, पालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी सभागृहात हजर राहत असतात. प्रत्येक प्रभागातील समस्या, अडचणी, विविध प्रस्ताव, ठराव आदीवर या महासभेत संक्षिप्त चर्चा होणे गरजेचे आहे. मात्र, विविध कारणांमुळे सभा तहकूब होण्याचे प्रमाण जास्त असल्याने सर्वांच्याच वेळेचा अपव्यय होताना दिसून येत आहे. प्रत्येक महासभेला जेवण, नाश्ता आदीची व्यवस्था पालिकेमार्फत करण्यात येत असते. हा खर्चही लाखोंमध्ये आहे. वारंवार सभा तहकूब केल्याने अतिरिक्त खर्चावर वाढही होत असते.
पनवेल महानगरपालिका नवीन असल्याने पालिकेच्या कामकाजावर अभ्यासपूर्ण चर्चा होणे गरजेचे आहे. गोंधळामुळे अशाप्रकारची सभा क्वचितच पाहावयास मिळते. विशेष म्हणजे, नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना बोलण्याची संधी मिळत नसल्याने त्यांच्यामध्येही नाराजीचा सूर उमटत असतो.
पहिल्यांदा निवडून सभागृहात आलेल्या नगरसेवकांना सभेचे कामकाज कसे चालते, याबाबत आदर्श घालून देण्याऐवजी आपापसातील वाद चव्हाट्यावर आणण्याचे प्रकारच सभागृहात मोठ्या प्रमाणात घडत असतात. पनवेल महानगरपालिकेच्या अद्याप नऊ महासभा पार पडलेल्या आहेत. या व्यतिरिक्त पाच विशेष सभाही पार पडलेल्या आहेत.

तहकूब सभांची माहिती

तहकूब महासभा पुढील तारीख
१८/११/२०१७ २२/११/२०१७
२०/०१/२०१८ २३/०१/२०१८
१७/०२/२०१८ २१/०२/२०१८
१९/०३/२०१८ २२/०३/२०१८
२६/०३/२०१८

गोंधळामुळे नाईलाजास्तव महासभा तहकूब कराव्या लागतात. यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, यासंदर्भात काळजी घेतली जाईल.
- डॉ. कविता चौतमोल, महापौर, पनवेल महापालिका

आयुक्त अनुपस्थित असल्याचे कारण पुढे करीत, सभा तहकूब केल्या जातात. मात्र, तहकूब महासभा आयुक्तांच्या अनुपस्थितीत चालविली जाते. सत्ताधाºयांमार्फत जनतेच्या पैशाचा अपव्यय सुरू आहे.
- प्रीतम म्हात्रे,
विरोधी पक्षनेते,
पनवेल महापालिका

सत्ताधारी जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी सभागृहात गोंधळ घालण्यात मश्गूल असतात. विशेष म्हणजे, पीठासन अधिकारी, महापौरच नगरसेवकांमध्ये भेदभाव करीत असतात. केवळ गोंधळ सदृश स्थिती असल्यानेच विकास खुंटला आहे.
- सतीश पाटील, नगरसेवक,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

Web Title:  Five General Elections in Panvel Municipal Corporation, time wastage of money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.