पनवेल : नवी मुंबई विमानतळाचे काम सुरू झाले आहे. उलवा टेकडीच्या सपाटीकरणासाठी दररोज सुरुंग लावुन विस्फोट घडविले जात आहेत . शनिवारी करण्यात आलेल्या अतितीव्रतेच्या स्फोटांमुळे उडालेल्या दगडामध्ये कामगारांसह सिध्दार्थ नगर मधील विजय यात्रे (वय. ६), प्रियंका यात्रे , आरती केवट, आदीसह आणखी दोन जन जखमी झाले आहेत.शनिवारी दुपारी ही घटना घडली. त्यामुळे या परिसरातील कामगारांना गंभीर दुखापत झाली. जखमींना नवी मुंबई मधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. स्फोटांची तीव्रता मोठी असल्याने जवळच्या सिध्दार्थ नगरमधील घराच्या भीतींला मोठे भगदाड पडले. तसेच अंगणवाडीचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे दोन दिवसापुर्वीच विमानतळ बाधीत वरचे ओवळे गावातील ग्रामस्थांनी विस्फोटांमुळे होणाºया त्रासा विरोधात मोर्चा काढला होता. त्यानंतर ही घटना घडली आहे. या घटनेची नोंद एनआरआय पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे .
नवी मुंबई विमानतळाच्या कामातील सुरुंग स्फोटात ५ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 12:04 AM