नोकरीच्या आमिषाने पाच जणांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 12:44 AM2021-01-16T00:44:53+5:302021-01-16T00:44:59+5:30

डेरवली पनवेल येथील चंद्रकांत कृष्ण वीर हे डेरवली बसस्टॉप येथील कृष्णा हार्डवेअर येथे कामानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांची वैभवशी ओळख झाली

Five people cheated by job lure | नोकरीच्या आमिषाने पाच जणांची फसवणूक

नोकरीच्या आमिषाने पाच जणांची फसवणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवीन पनवेल : माझगाव डॉक येथे शिपाई आणि स्टोअरकीपर म्हणून नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून पाच जणांची एक लाख ६५ हजारांची फसवणूक झाली. तालुका पोलिसांनी वैभव कांबळेला अटक केली.

डेरवली पनवेल येथील चंद्रकांत कृष्ण वीर हे डेरवली बसस्टॉप येथील कृष्णा हार्डवेअर येथे कामानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांची वैभवशी ओळख झाली. यावेळी वैभवने विक्रीकर विभाग, माझगाव डॉक येथे नोकरभरती चालू असल्याचे सांगितले. यावेळी वीर याने तो दहावी पास असून नोकरी मिळू शकते का, अशी विचारणा केली. यावेळी वैभवने शिपाई या पदावर नोकरीसाठी ६५ हजार रुपये खर्च येईल, असे सांगितले. त्यानंतर वीर याने ४० हजार रुपये वैभवला दिले. त्यानंतर शिपाईपदाचे नियुक्तीपत्र कुरिअरद्वारे येईल आणि नोकरीवर हजर केले जाईल, असे सांगितले. मात्र, नियुक्तीपत्र आले नाही. त्यानंतर वैभवने विरारच्या अमित कुलयेकडून पैसे घेतले. वैभवला  न्यायालयात हजर केले असता १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Five people cheated by job lure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.