पाच दरोडेखोर जेरबंद
By Admin | Published: July 15, 2015 11:43 PM2015-07-15T23:43:37+5:302015-07-15T23:43:37+5:30
वसई पूर्व भागातील पारोळ फाटा येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या पाच दरोडेखोरांना मंगळवारी रात्री ३.३० च्या सुमारास मांडवी पोलीसांनी ताब्यात घेतले.
पारोळ : वसई पूर्व भागातील पारोळ फाटा येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या पाच दरोडेखोरांना मंगळवारी रात्री ३.३० च्या सुमारास मांडवी पोलीसांनी ताब्यात घेतले.
विजय शिंदे (२७) रा. कोयना वसाहत शिवशक्ती चाळ गोरेगाव, संजय सपकाळ (२७) रा. संतोषनगर गोरेगाव, मुंबई, राहुल माने (२४) रा. गोविंद नगर मालाड, संतोष राजभर (२४) रा. कोयना वसाहत ही दरोडेखोरांची नावे असून त्यांच्याकडून कॉलीस गाडी, दोन कटावणी, आठ चोरलेले मोबाईल, टॉवरच्या बॅटऱ्या, पाच मोबाईल, तार, दोरी, छीनी, दोन लोखंड कापण्याचे ब्लेड, कोयता, मिरची पावडर आदी साहित्य जप्त केले आहे.
मंगळवारी रात्रीच्या वेळी मांडवी परीक्षेत्राचे उपनिरिक्षक जंगम हे गस्थ घालत असताना त्यांना पारोळ फाटा येथे कॉलीस गाडी संशयीतरीत्या उभी दिसली. त्यांनी त्यामधील पाच व्यक्तींची चौकशी केली असता
त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळी मांडवी
पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्याचवेळी चौकशी दरम्यान गाडीमध्ये असलेल्या महागड्या बॅटऱ्या पारोळ येथील मोबाईल टॉवरच्या चोरल्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या दरोडेखोरांना अटक केली असून पुढील तपास उपनिरिक्षक ठोणे करीत आहेत. (वार्ताहर)