घणसोली परिसरातील पाच गावे अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 04:57 AM2019-03-06T04:57:12+5:302019-03-06T04:57:14+5:30
वीज महावितरण कंपनीच्या कळवा येथील वीज उपकेंद्रात उच्च दाबाने वीजपुरवठा करणारी केबल जळाल्याने घणसोली, दिवा कोळीवाडा सेक्टर ८ आणि ९, तळवली, गोठीवली आणि रबाळे या पाच गावांचा वीजपुरवठा खंडित झाला.
Next
नवी मुंबई : वीज महावितरण कंपनीच्या कळवा येथील वीज उपकेंद्रात उच्च दाबाने वीजपुरवठा करणारी केबल जळाल्याने घणसोली, दिवा कोळीवाडा सेक्टर ८ आणि ९, तळवली, गोठीवली आणि रबाळे या पाच गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजता हा प्रकार घडला आहे. याबाबत महावितरणचे ऐरोली विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सतीश शिंपी म्हणाले की, कळवा वीज उपकेंद्रात कचऱ्याला आग लागून त्याची झळ या केबलला बसली.
पण दुरुस्तीचे काम केले असून मध्यरात्री १ वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल.