कमलाकर कांबळे /नवी मुंबई
लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई: स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन कोकणभवन येथे जल्लोषात साजरा झाला. यावेळी कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते कोकण भवनच्या प्रांगणात सकाळी ध्वजारोहण करण्यात आले.
कोकण भवन इमारतीच्या प्रांगणात “हर घर तिरंगा” या उपक्रमांतर्गत इमारतीच्या आवारात भव्य दिव्य असा मंच उभारून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. इमारतीच्या आवारात नवनवीन संकल्पनेतून आकर्षक असे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा संदेश देणारी रांगोळी, सेल्फी पॉईंट उभारण्यात आले होते.
यावेळी नवी मुंबई पोलीस पथक यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या कार्यक्रमास बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र प्रविण पवार, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, नगरपरिषद संचालकक तथा आयुक्त मनोज रानडे, अप्पर आयुक्त कोकण विभाग किशन जावळे, उपायुक्त (महसूल) विवेक गायकवाड, उपायुक्त (सामान्य) अजित साखरे, उपायुक्त (पुनर्वसन) रिता मैत्रेवार, उपायुक्त (पुरवठा) रवि पाटील, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, उपायुक्त (विकास आस्थापना) मिनल कुटे, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे, डॉ.प्रकाशराव शेंडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश धुमाळ तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
कोकण विभागात यशस्वीरित्या पार पडलेल्या महसूल सप्ताह दरम्यान झालेल्या विविध कामांचा आढावा घेणारी “महसूल सप्ताह इंद्रधनुष्य पुस्तिका-2023”चे विभागीय महसूल आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच कोकण विभागातील आपत्ती व्यवस्थापनासाठी तयार करण्यात आलेल्या वॉररुमचे उद्घाटन नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांच्या हस्ते करण्यात आले. तर नोंदणी शाखेचे उद्घाटन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कोकण भवन इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील महसूल विभागाच्या पुरवठा शाखेचे उद्घाटन विभागीय महसूल आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागीय महसूल आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निंबाजी गीते यांनी केले.