प्रजासत्ताकदिनानिमित्ताने पनवेल महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण

By वैभव गायकर | Published: January 26, 2024 06:17 PM2024-01-26T18:17:41+5:302024-01-26T18:42:25+5:30

वैभव गायकर  पनवेल : प्रजासत्ताकदिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्यावतीने मुख्यलयाच्या जवळील छत्रपती संभाजी महाराज मैदानावर दि.26 रोजी प्रशासक तथा आयुक्त गणेश ...

Flag Hoisting at Panvel Municipal Headquarters on the occasion of Republic Day | प्रजासत्ताकदिनानिमित्ताने पनवेल महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण

प्रजासत्ताकदिनानिमित्ताने पनवेल महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण

वैभव गायकर 

पनवेल : प्रजासत्ताकदिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्यावतीने मुख्यलयाच्या जवळील छत्रपती संभाजी महाराज मैदानावर दि.26 रोजी प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  
  
यावेळी  अतिरीक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, नगर रचना संचालक ज्योती कवाडे मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी,मुख्य अभियंता संजय जगताप, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, उपमुख्य लेखा परीक्षक संदिप खुरपे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, माजी नगरसेवक यांच्यासह पालिकेतील सर्व विभांगाचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी , शाळांचे विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, नागरिक, पत्रकार उपस्थित होते. यावेळी रायगड सुरक्षा रक्षक मंडळ, महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल,पालिकेचे अग्निशमन दलाच्या जवानांनी संचलन केले तसेच ध्वजाला मानवंदना दिली. तसेच सुरक्षा रक्षकांनी बाईक स्टंट सादर केले. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेच्या शिक्षण विभागातील 10 शाळांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे केली. 

याबरोबरच आयुक्त बंगल्यातही आयुक्त गणेश देशमुख यांच्या पत्नी नेहा देशमुख यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहण  करण्यात आले.

हुतात्मा स्मारक येथे ध्वजवंदन     

प्रजासत्ताक  दिनानिमित्ताने हुतात्मा स्मारक येथे थोर स्वातंत्र्य सैनिक किसन जगनाडे यांचे सुपुत्र नारायण जगनाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, उपविभागीय अधिकारी राहूल मुंडके, अतिरीक्त आयुक्त भारत राठोड , उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, तहसीलदार विजय पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे,  माजी नगरसेवक, स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार, महापालिका अधिकारी-कर्मचारी,जेष्ठ नागरिक , नागरिक उपस्थित होते.

Web Title: Flag Hoisting at Panvel Municipal Headquarters on the occasion of Republic Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.