बाजार समितीत मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण, हजारो मराठा आंदोलकांची उपस्थिती

By नामदेव मोरे | Published: January 26, 2024 09:30 AM2024-01-26T09:30:05+5:302024-01-26T09:38:07+5:30

बाजार समितीत ध्वजारोहणासाठी आतापर्यंतची विक्रमी गर्दी

Flag hoisting by Manoj Jarange Patil in market committee, presence of thousands of Maratha protesters | बाजार समितीत मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण, हजारो मराठा आंदोलकांची उपस्थिती

बाजार समितीत मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण, हजारो मराठा आंदोलकांची उपस्थिती

नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळेस हजारो मराठा आंदोलक उपस्थित होते. बाजार समितीत प्रथमच ध्वजारोहणासाठी एवढी गर्दी झाली होती. आदोलकांनी मार्केट बाहेर वाहतूक पोलीस चौकी बाहेर ही ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थिती दर्शविली.
         
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो मराठा आंदोलकांची बाजार समितीच्या पाच मार्केट मध्ये राहण्याची व्यवस्था केली होती.पहाटे पाच वाजता मनोज जरांगे पाटील मार्केट मध्ये पोहचले. बाजार समितीच्या गेस्ट हाऊस मध्ये काहीवेळ आराम केल्यानंतर ते येथील  ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित राहिले. सभापती अशोक डक यांच्यासोबत त्यांनी ध्वजारोहण केले. 

या सोहळ्यास हजारो मराठा आंदोलक उपस्थित होते. मार्केट मधील ध्वजारोहण सोहळ्यास प्रथमच एवढी गर्दी झाली होती. बाजार समितीबाहेर वाहतूक पोलीस चौकीसमोर आयोजित ध्वजारोहण सोहळ्यास ही आंदोलकांनी उपस्थिती दर्शविली.

Web Title: Flag hoisting by Manoj Jarange Patil in market committee, presence of thousands of Maratha protesters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.