नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळेस हजारो मराठा आंदोलक उपस्थित होते. बाजार समितीत प्रथमच ध्वजारोहणासाठी एवढी गर्दी झाली होती. आदोलकांनी मार्केट बाहेर वाहतूक पोलीस चौकी बाहेर ही ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थिती दर्शविली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो मराठा आंदोलकांची बाजार समितीच्या पाच मार्केट मध्ये राहण्याची व्यवस्था केली होती.पहाटे पाच वाजता मनोज जरांगे पाटील मार्केट मध्ये पोहचले. बाजार समितीच्या गेस्ट हाऊस मध्ये काहीवेळ आराम केल्यानंतर ते येथील ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित राहिले. सभापती अशोक डक यांच्यासोबत त्यांनी ध्वजारोहण केले.
या सोहळ्यास हजारो मराठा आंदोलक उपस्थित होते. मार्केट मधील ध्वजारोहण सोहळ्यास प्रथमच एवढी गर्दी झाली होती. बाजार समितीबाहेर वाहतूक पोलीस चौकीसमोर आयोजित ध्वजारोहण सोहळ्यास ही आंदोलकांनी उपस्थिती दर्शविली.