१२ फूट खोल पाण्यात ध्वजारोहण, संचलन; नौदलातील ११ सेवानिवृत्त कंमोडोंची मानवंदना, जगातील पहिलाच प्रयोग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2022 07:37 PM2022-08-15T19:37:47+5:302022-08-15T19:49:03+5:30

सेवानिवृत्त कमांडो रवींद्र कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हा अनोखा सांघिक ध्वजारोहण कार्यक्रम पाहण्यासाठी स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांनी विमला तलाव परिसरात गर्दी केली होती.

flag hoisting in 12 feet deep water the first experiment in the world | १२ फूट खोल पाण्यात ध्वजारोहण, संचलन; नौदलातील ११ सेवानिवृत्त कंमोडोंची मानवंदना, जगातील पहिलाच प्रयोग!

१२ फूट खोल पाण्यात ध्वजारोहण, संचलन; नौदलातील ११ सेवानिवृत्त कंमोडोंची मानवंदना, जगातील पहिलाच प्रयोग!

Next

मधुकर ठाकूर -

उरण : नौदरातील अकरा सेवानिवृत्त कंमोडोंची चार आठवड्यांची मेहनत आणि सरावानंतर, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून उरणच्या ऐतिहासिक विमला तलावात १२ फूट खोल पाण्यात ध्वजारोहण, संचलन व शहीदांना सलामी देण्यात आली. हा कार्यक्रम रविवारी रात्री पार पडला. हा भारतीलच नव्हे तर जगातील पहिलाच प्रयोग मानला जात आहे.

सेवानिवृत्त कमांडो रवींद्र कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हा अनोखा सांघिक ध्वजारोहण कार्यक्रम पाहण्यासाठी स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांनी विमला तलाव परिसरात गर्दी केली होती. नौदलाचे सेवानिवृत्त कमांडो रवींद्र कुलकर्णी यांना दोन महिन्यांपूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी काही तरी नवीन, अनोखे करण्याची कल्पना सुचली. यापूर्वी त्यांनी पाण्याखाली लग्न सोहळा करण्याची कल्पना प्रत्यक्षात यशस्वीरीत्या उतरवली होती. त्याचा अनुभव गाठीशी असल्याने कुलकर्णी यांनी कधीही, कुठेही आणि कुणीही न केलेला १२ फुटी खोल पाण्याखाली ध्वजारोहण संचलन व शहिदांना वंदन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी आपल्या नौदलाच्या सेवानिवृत्त झालेल्या अन्य दहा कमांडोजशी चर्चा केली आणि त्यांच्या होकारानंतर उरणमधील ऐतिहासिक विमला तलावात १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला रात्री १०. ३० वाजता ध्वजारोहण संचलन व शहीद वंदनेचा हा सोहळा पार पाडण्याची तयारी सुरू केली.

 यासाठी विमला तलावात १२ फूट खोल स्विमिंग पूलमध्ये डायविंग उपकरणासहित सुसज्ज असलेल्या भारतीय मरीनच्या माजी कमांडोच्या टीमचा महिन्या भरापासून सराव सुरू होता. महिनाभराच्या सरावानंतर उरणच्या विमला तलावात ध्वजारोहण संचलन व शहीद वंदनेचा अनोखा सोहळा दिमाखात पार पडला.


हे करीत असताना राष्ट्रगीताचे मंजूळ स्वर तलावातून तलावाबाहेर सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी हजेरी लावलेल्या शेकडो स्वातंत्र्य प्रेमींच्या कानी पडले आणि त्यांनी भारतमातेचा जयघोष केला. राष्ट्रभक्ती दर्शविणारा हा सोहळा उरणकरांसह देशासाठीही अभिमानास्पद ठरला असल्याच्या भावना सेवानिवृत्त कमांडो रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.
  
फक्त ३२ मिनिटांत ध्वजारोहण संचलन व शहीद वंदनेचा अनोखा सोहळा पार पडला. याआधी काही देशांत फक्त दोघांनी पाण्यात उतरून ध्वज पकडण्याचा सोहळा केला आहे. मात्र नौदलाच्या सेवानिवृत्त ११ कमांडोजनी १२ फुटी पाण्याखाली झेंडावंदन, ध्वजसंचलन, राष्ट्रगीत, परेड भारतातच नव्हे, तर जगातील एकमेव घटना असल्याचा दावा सेवानिवृत्त कमांडो रवींद्र कुलकर्णी यांनी माहिती देताना केला आहे.
 
यावेळी, रवींद्र कुलकर्णी, नंदलाल यादव, रामदास कळसे, सज्जन सिंग, भुपेंद सिंग, ब्रीजभुषण शर्मा, रामेश्वर यादव, विनोद कुमार, महेंद्र सिंग, अनिल घाडगे आणि एल.सी.जगजीवन हे नौदलाचे सेवानिवृत्त कमांडो

Web Title: flag hoisting in 12 feet deep water the first experiment in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.