फ्लेमिंगोचा आवडता डीपीएस तलाव बिल्डरांना आंदण,पर्यावरणप्रेमींचे  मुख्यमंत्र्यांना पत्र

By नारायण जाधव | Published: March 2, 2024 04:59 PM2024-03-02T16:59:44+5:302024-03-02T17:02:16+5:30

पर्यावरणाच्या नाशाच्या विरोधात पर्यावरणप्रेमींचे  मुख्यमंत्र्यांना पत्र.

flamingo's favorite DPS is a delight for pool builders environmentalists write letter to chief minister eknath shinde | फ्लेमिंगोचा आवडता डीपीएस तलाव बिल्डरांना आंदण,पर्यावरणप्रेमींचे  मुख्यमंत्र्यांना पत्र

फ्लेमिंगोचा आवडता डीपीएस तलाव बिल्डरांना आंदण,पर्यावरणप्रेमींचे  मुख्यमंत्र्यांना पत्र

नारायण जाधव, नवी मुंबई:नवी मुंबईतील फ्लेमिंगोच्या मोठ्या निवासस्थानांपैकी एक असलेला ३० एकरचा डीपीएस तलाव व्यावसायिक विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी गाडला जाण्याचा धोका आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने (मनपा) राज्य सरकारला सादर केलेल्या नव्या विकास आराखड्यात (DP) व्यावसायिक विकासासाठी सेक्टर 52 म्हणून चिन्हांकित DPS तलाव केला आहे.

नवी मुंबईसाठी फ्लेमिंगो सिटी नाव सुचविणाऱ्या नॅटकनेक्ट फाउंडेशनने जैवविविधतेने परिपूर्ण असलेले विशाल जलसाठा नष्ट करण्याच्या कटाचा मुख्यमंत्र्यांकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. नेरूळ येथील पर्यावरणवादी सुनील अगरवाल यांनीही नाराजी व्यक्त केली आहे 

मनपाच्या मसुद्यातील DP मध्ये पणथळ म्हणून दर्शविलेला हा परिसर, मुंबई  आणि नवी मुंबईतील मोठ्या संख्येने पक्षी निरीक्षकांना त्याच्या निसर्गसौंदर्यासाठी आकर्षित करतो.  
NMMC ने 23 फेब्रुवारी 2024 रोजी राजपत्रातील अधिसूचनेत आपल्या मसुद्याच्या डीपीमध्ये सुधारणा सादर केल्या आहेत आणि लेआउटसह तपशील मनपाच्या वेबसाइटवर नुकतेच अपलोड केले आहेत. बीएनएचएसच्या अभ्यासानुसार दोन वर्षांपूर्वी 5,000 हून अधिक फ्लेमिंगो सरोवरात उतरले होते. पक्षीप्रेमी सांगतात की त्यांची संख्या वाढत आहे.

खरेतर, NMMC ने DPS तलावाचे फ्लेमिंगोचे निवासस्थान म्हणून संवर्धन करण्याची योजना आखली होती आणि BNHS सोबत एक योजना तयार केली होती.  
तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी पहिल्या नवी मुंबई फ्लेमिंगो उत्सवाला  भेट दिल्यानंतर म्हणाले कि फ्लेमिंगोची ठिकाणे, म्हणजे शहरातील पाणथळ जागा, संरक्षित करण्याची गरज आहे. असे नॅटकनेक्टचे संचालक बी एन कुमार यांनी सांगितले.
स्थलांतरित पक्ष्यांचे मानवी हस्तक्षेप आणि त्रासापासून संरक्षण करण्यासाठी NMMC ने तलावाभोवती कुंपण बांधले.

आरक्षण हटविण्यावर टिप्पणी करण्यास विचारले असता, NMMC चे सहाय्यक संचालक - नगर नियोजन, सोमनाथ केकाण म्हणाले की, डीपीमध्ये दुरुस्ती सिडकोच्या नोडल प्लॅननुसार केली ली होती.सिडकोच्या योजनेत, डीपीएस तलाव क्षेत्र "भविष्यातील विकासासाठी" म्हणून चिन्हांकित केले आहे, कुमार यांनी लक्ष वेधले. 2011 मध्ये तलावावर डेब्रिज टाकण्यास स्थानिक लोक आणि पर्यावरणवाद्यांनी विरोध केला होता.  तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मध्यस्थी करून डेब्रिज डम्पिंग बंद केले.

काही गैरप्रकारांनी आंतरभरतीच्या पाण्याचा मुक्त प्रवाह वारंवार रोखल्याने तलावावर हल्ला झाला आहे.अलीकडेच एका महाकाय साइन बोर्डवर आदळून सात फ्लेमिंगोचा मृत्यू झाल्यामुळे हा तलाव चर्चेत आला होता.कमी उडणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांच्या धोक्याबद्दल निषेध आणि चिंतेमुळे हे फलक नुकतेच काढून टाकण्यात आले.

नैसर्गिक पूर नियंत्रण यंत्रणेचा भाग असलेल्या आणि कार्बन सिंक म्हणून काम करणाऱ्या पाणथळ जमिनींचे महत्त्व सिडकोने ओळखले नाही याबद्दल नॅटकनेक्टने खेद व्यक्त केला.  किमान NMMC ने DPS तलावासारख्या पाणथळ जागा व्यावसायिक विकासासाठी चिन्हांकित करण्याऐवजी त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करावा, असे कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

Web Title: flamingo's favorite DPS is a delight for pool builders environmentalists write letter to chief minister eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.