‘फ्लॅश लाइट’मुळे होताहेत अपघात
By admin | Published: November 16, 2015 02:20 AM2015-11-16T02:20:57+5:302015-11-16T02:20:57+5:30
चारचाकी तसेच दुचाकी वाहनांना फ्लॅश लाइट, सेन्सर लाइट सर्रास लावले जात आहेत. रात्रीच्या वेळेस हे लाइट थेट समोरच्या वाहनचालकांच्या डोळ्यांवर येत असल्यामुळे समोरच्या वाहनाचा अंदाज येत नाही.
प्रशांत शेडगे, पनवेल
चारचाकी तसेच दुचाकी वाहनांना फ्लॅश लाइट, सेन्सर लाइट सर्रास लावले जात आहेत. रात्रीच्या वेळेस हे लाइट थेट समोरच्या वाहनचालकांच्या डोळ्यांवर येत असल्यामुळे समोरच्या वाहनाचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहनावर आदळून अपघाताच्या घटना घडत आहेत. या अवैध लाइट विक्र ीवर आणि अशा वाहनांवर आरटीओ व वाहतूक पोलिसांचा अंकुश नसल्यामुळे पनवेल परिसरात दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत.
पनवेल परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, शहरात अनेक चौकांत नसलेली सिग्नल यंत्रणा आदी कारणांमुळे वाहनांच्या अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे, तर दुसरीकडे सध्या दुचाकी, चारचाकी वाहनांना विविध प्रकारचे लाल, निळे, पांढरे असे विविध रंगांचे सेन्सर लाइट बसवण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. तीव्र प्रकाश असणारे हे लाइट अन्य वाहनचालकांच्या डोळ्यांवर चमकत असल्याने वाहन चालवण्यास अडचणी येतात. या प्रकारामुळे आता छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सर्वाधिक अपघात रात्रीच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी, आॅटो आणि ट्रकमध्ये होत आहेत. या सर्व पाशर््वभूमीवर पोलीस प्रशासन आरटीओ अशा प्रकारच्या एलइडी लाइट्स बसवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना दिसून येत नाहीत. वाहनांना बसवण्यात येणाऱ्या चमकदार विद्युत दिव्यांमुळे अन्य वाहचालकांना त्याचा त्रास होतो.