ठाणे-बेलापूर रस्त्यावरील उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 01:52 AM2019-12-27T01:52:27+5:302019-12-27T01:52:31+5:30

नागरिकांना दिलासा : २८ कोटींच्या खर्चाच्या प्रकल्पाला मंजुरी

Fly off the Thane-Belapur road | ठाणे-बेलापूर रस्त्यावरील उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा

ठाणे-बेलापूर रस्त्यावरील उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा

Next

नवी मुंबई : तुर्भे रेल्वे स्थानकासमोर ठाणे-बेलापूर रस्त्यावर उड्डाणपूल नसल्याने रस्ता ओलांडताना आजवर अनेक वाहने आणि नागरिकांचे अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये अनेक नागरिक मृत्युमुखी पडले असून, अनेक नागरिक जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत. या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात यावा, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून वारंवार होत असल्याने महापालिकेने या मार्गावर उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला असून, महासभेत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी सुमारे २८ कोटींचा खर्च होणार आहे.

तुर्भे एमआयडीसी भागात कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून, तुर्भे भागातील नागरिकांनाही कामानिमित्त ये-जा करण्यासाठी ठाणे-बेलापूर रस्ता ओलांडावा लागतो. या मार्गावर तुर्भे रेल्वे स्थानकासमोरून वाहने आणि नागरिक यांची रस्ता ओलांडणाऱ्यांची संख्या मोठी असून, या मार्गावरून भरधाव येणाºया वाहनांमुळे आजवर अनेक अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये अनेक नागरिक जखमी झाले असून, अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या ठिकाणी पादचारी पूल उभारावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधींकडून केली जात होती; परंतु निविदेतील तांत्रिक अडचणींमुळे पादचारी पुलाचे काम करण्यासाठी कंत्राटदार उपलब्ध होत नव्हते. पादचारी पूल बांधणे शक्य नसल्यास या ठिकाणी नागरिक आणि वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उड्डाणपूल बांधावा, अशी आग्रही भूमिका नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी घेतली होती. त्या अनुषंगाने पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी या भागाची पाहणी करून परिस्थितीचा आढावाही घेतला होता.
या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याची साकात्मक भूमिका घेत याबाबतचा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी मांडला. या कामासाठी सुमारे २८ कोटी रु पये खर्च केले जाणार असून, सदर प्रस्तावाला महासभेची मंजुरी मिळाली आहे.

ठाणे-बेलापूर महामार्गावर अनेक नागरिकांचे अपघात झाले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी पादचारी पूल बांधावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करत होतो; त्यानुसार महापालिका आयुक्तांनी सकारात्मकता दाखवली असून, अखेर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. जानेवारी महिन्यात या कामाला प्रत्यक्षात सुरु वात होईल.
- सुरेश कुलकर्णी, नगरसेवक
 

Web Title: Fly off the Thane-Belapur road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.