लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल पालिकेचा प्रचार सोमवारी सायंकाळी थंडावला. आता मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असल्याने उमेदवारांकडून लक्ष्मीदर्शन होण्याची शक्यता आहे. अशी व्यक्ती आढळल्यास त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी मनसेने दोनशे कार्यकर्त्यांची टीम तयार केली असल्याची माहिती मनसेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संदीप देशपांडे यांनी सोमवारी खारघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, जिल्हा चिटणीस केसरीनाथ पाटील, खारघर शहर विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अक्षय काशिद, प्रसाद परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.पालिका निवडणुकीत मनसेचे २६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. लक्ष्मीदर्शन घडविणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मनसेने टीम तयार केली असून एका टीममध्ये सात सदस्य आहेत. पत्रकार परिषदेत मनसेचा वचकनामा प्रसिद्ध करण्यात आला. यात वाढते प्रदूषण टाळण्यासाठी प्लास्टिकमुक्त पनवेल पालिका, पायाभूत सुविधा, झोपडपट्टीवासीयांसाठी घरकूल योजना, शहरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणार, प्रकल्पग्रस्तांना पालिकेत नोकरी, महिला सक्षमीकरण आदींचा समावेश करण्यात आला आहे.
पैसे वाटणाऱ्यांवर ठेवणार लक्ष
By admin | Published: May 23, 2017 2:13 AM