नवी मुंबई : मुंबई, नवी मुंबईसह राज्यभरातील महानगरे ड्रग्जच्या विळख्यात सापडत चालली आहेत. कल्चरच्या नावाखाली विद्यार्थ्यांसह बेरोजगार तरुण, तरुणी नशेच्या आहारी जात आहेत. या परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चिंता व्यक्त केली आहे. शिवाय ड्रग्जआडून अदृश्य शक्तींकडून थेट देशाच्या भवितव्यावरच हल्ला होत असल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्याने ड्रग्ज विक्रीतल्या विदेशी टोळ्या देशाची डोकेदुखी ठरत असल्यावर शिक्कामोर्तब होत आहे.
मागील पाच ते सहा वर्षांत नवी मुंबईतल्या गल्ली-बोळांत ड्रग्जचे जाळे पसरले आहे. हे ड्रग्ज विक्री व पुरवठा करणाऱ्यांमध्ये नायजेरियन टोळ्यांचा सहभाग समोर येत आहे. त्यांच्यावर कारवाईत पोलिसांना मर्यादेचे ‘बंधन’ असल्याने त्यांची साखळी कायमची तुटू शकलेली नाही. नवी मुंबई पोलिसांनी गतवर्षात एनडीपीएसच्या ६६० कारवायांमधून ३३.२७ कोटींचे ५७२ किलो अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्यामध्ये ५८ नायजेरियन व्यक्तींना अटक केली आहे. त्याशिवाय अवैध वास्तव्य केल्याप्रकरणी ६६९ नायजेरियन नागरिकांना मायदेशी पाठवून ५४० जणांना ब्लॅकलिस्ट केले आहे. ड्रग्ज तस्करी, अवैध वास्तव्याप्रकरणी नायजेरियनवर झालेल्या कारवाईंचे प्रमाण बांगलादेशींपेक्षाही अधिक आहे.
नायजेरियन टोळ्यांवर सर्वाधिक कारवाया२०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये सर्वाधिक नायजेरियन टोळ्यांवर कारवाया झाल्या आहेत. त्यांच्या राहत्या ठिकाणांवर रात्री-अपरात्री छापे टाकून त्यांच्याकडील चरस, कोकेन, एमडी असे ड्रग्ज जप्त केले आहेत. त्यावरून ड्रग्ज तस्करी व विक्रीत विदेशी ताकद सक्रिय असल्याचे स्पष्ट होत आहे. तीन वर्षांपूर्वी जेएनपीटी परिसरातून जप्त केलेल्या ३६२ कोटींच्या ड्रग्जचेही देशाबाहेर संबंध जोडले होते; परंतु शिक्षण, व्यवसायाच्या नावाने व्हिसा मिळवून भारतात प्रवेश करणाऱ्या नायजेरियनचे लोंढे, परत न जाता मुंबईलगत नवी मुंबईसारख्या शहरात आश्रय मिळवून ड्रग्ज रॅकेट चालवत आहेत. त्यांना ते पुरवते कोण? हे कोठून येते याचे कोडे मात्र सुटलेले नाही. परिणामी गल्लीबोळांत अमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने, तरुणांना नशेच्या आहारी ढकलून त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे भवितव्य, तसेच देशाची तरुण पिढी उद्ध्वस्त करण्याचे देशविघातक काम होताना दिसत आहे.
नवी मुंबई पोलिसांची कारवाई अमली पदार्थ २०२३ २०२४ मेथॉक्युलॉन ५,९६,५२,७६० १२,६७,६९,८८०गांजा ८,३६,९३१ ६७,८३,४४५कोडाईन सिरप २,०८,३३३ ३,२६४एलसीडी पेपर १९,८०,७५० ३३,५५,०००एमफेटाईन २३,८४,००० ०००एमडीएमए २२,१०,००० २९,९८,००० एमडी ९,३३,३४,९०० ००० हेरॉइन ३३,१६० ४७,१५,५००ब्राउन शुगर १,७८,९२० ३०,१०,०००कोकेन १,२५,२०,००० १६,७०,१४,८००ट्रॅमड्रॉल टॅबलेट ३,६४,४०,००० ००००