शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांना काँग्रेसने दोनदा मुख्यमंत्रीपद दिले पण पक्ष संकटात असताना ते भाजपात गेले"
2
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
3
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
4
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
5
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
6
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
7
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
8
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
10
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
11
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
12
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
14
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
15
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
16
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
17
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
18
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
19
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
20
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...

ठेकेदारावर वनविभागाची कारवाई

By admin | Published: March 31, 2017 6:26 AM

पेण तालुक्यातील औषधी वनसंपत्तीचा ठेकेदारांकडून चुकीच्या पद्धतीने वापर होत आहे. फक्त पेण तालुक्यातच नाही

सुनील बुरूमकर / कार्लेखिंडपेण तालुक्यातील औषधी वनसंपत्तीचा ठेकेदारांकडून चुकीच्या पद्धतीने वापर होत आहे. फक्त पेण तालुक्यातच नाही तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील वनांमधील अवस्था हीच आहे, असे निदर्शनास येत आहे. बुधवार, २९ मार्चला यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर त्याचे पडसाद वनखात्यातील कार्यालयामध्ये दिसले. सालडोन या वृक्षापासून डिंक काढण्याचा ठेका सलाम हसन दुस्ते या ठेकेदारास दिला आहे. चुकीच्या पद्धतीने या वनौषधी वृक्षापासून डिंक काढला जात आहे. हे जेव्हा धावटा येथील ग्रामस्थांच्या लक्षात आले त्या वेळी ‘लोकमत’चे वार्ताहर आणि वृक्षमित्र यांनी वनविभाग पेण या कार्यालयात वनपाल पी. के. पाटील यांच्याकडे याबाबत विचारणा करण्यात आली. त्यानंतर वनरक्षकांबरोबर धावटा या वनविभागात धाव घेतली आणि सालडोन या वृक्षावरील डिंक कशा पद्धतीने काढला जातो याची पाहणी करण्यात आली. डिंक काढण्याचा ठेका दिला त्याला पाच महिने झाले तरी त्याची जबाबदार म्हणून वनपाल किंवा वनरक्षक यांच्याकडून तपासणी झालेली दिसत नाही. या गोष्टीस ठेकेदार आणि वनखात्यातील संबंधित कर्मचारी जबाबदारी आहेत. ठेकेदारास दिलेला कालावधीमध्ये ठरलेल्या महसुलाप्रमाणे किती किलो डिंक काढला जातोय याचे गूढ कायम आहे.पेण वनक्षेत्र अधिकारी एस. आर. पवार यांच्याशी संपर्क साधला असता सलाम दुस्ते यास हजर करण्यात आले. नियम व अटींच्या अधीन न राहता चुकीच्या पद्धतीने डिंक काढण्यात आला आहे. हा गुन्हा त्यांनी कबूल केला आहे. या गुन्ह्याबाबत चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. परंतु वर्षातील ३१ मार्चमधील कामे असल्यामुळे पुढील कार्यवाहीची माहिती दोन दिवसांनी कळविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच उघडकीस आलेल्या गुन्ह्याबाबत चौकशी करण्यासाठी जिल्ह्याच्या वनसंरक्षक अधिकारी जयोती बॅनर्जी आणि उप वनसंरक्षक अधिकारी ढगे यांच्याशी संपर्क झाला नाही.