शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

फ्लेमिंगोंच्या विमान अपघातातील मृत्यूची वनविभागाकडून चौकशी

By नारायण जाधव | Published: May 21, 2024 6:37 PM

अपर मुख्य प्रधान वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांची माहिती

नवी मुंबई : दुबईहून मुंबईत येत असलेल्या एमिरेट्सच्या विमानाला घाटकोपर येथे सोमवारी रात्री ८.४० वाजता धडक देऊन ३९ फ्लेमिंगोचा मृत्यूप्रकरणी वनविभागाने तत्काळ चौकशी सुरू केली असल्याचे राज्याचे अपर मुख्य प्रधान वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांनी सांगितले. २० मे रोजी रात्री ८:४० वाजता घाटकोपर-अंधेरी लिंक रोड, लक्ष्मीनगर-पंतनगर भागात विमानाला धडकून फ्लेमिंगाे ३९ पक्षी मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत बहादुरे, त्यांचे सहकारी तत्काळ घटनास्थळी पाेहोचून पाहणी सुरू केली. 

त्यानंतर विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, मुंबई कांदळवन विभागाचे सहायक वनसंरक्षक विक्रांत खाडे हे कर्मचाऱ्यांना घेऊन अपघातस्थळाची पाहणी करून २९ मृतपक्षी ताब्यात घेतले. २१ मे रोजी सकाळी पुन्हा पाहणी केली असता आणखी १० मृत पक्षी सापडले. या सर्व मृत पक्ष्यांचे ऐरोलीतील वन विभागाच्या सागरी-किनारी जैवविविधता केंद्रात शवविच्छेदन करण्यात येत आहे.

दीपक खाडेंचे पथक करणार तपासया संपूर्ण घटनेचा तपास विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई कांदळवन विभागाचे सहायक वनसंरक्षक विक्रांत खाडे करीत असल्याचे रामाराव यांनी स्पष्ट केले आहे. मॅन्ग्रोव्ह समिती २९ मे राेजी करणार डीपीएस तलावाची पाहणी फ्लेमिंगाेचे अधिवास क्षेत्र असलेल्या नवी मुंबईतील ३० एकरांतील डीपीएस तलाव वाचविण्यासाठी नॅट कनेक्टच्या तक्रारीवर मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेली मॅन्ग्रोव्ह समिती येत्या २९ मे रोजी या तलावाची तपासणी करणार आहे, तर केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयानेही राज्य पर्यावरण विभागाला चौकशी करून अहवाल देण्यास सांगितले असल्याचे नॅट कनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले.

सागर शक्तीचे नंदकुमार पवार यांनी उरण तालुक्यातील बेलपाडा, भेंडखळ आणि पाणजे पाणथळीच्या जागा सिडकोने तथाकथित पायाभूत सुविधांसाठी भाड्याने दिल्याने नष्ट होत असल्याचे सांगितले. याप्रमाणेच खारघरमधील पाणथळींच्या ठिकाणी इतर पक्ष्यांच्या प्रजातींव्यतिरिक्त फ्लेमिंगोदेखील येतात, असे पक्षीप्रेमी ज्योती नाडकर्णी म्हणाल्या. या पक्ष्यांचा त्यांच्या अधिवासावर हक्क आहे, ज्यापैकी मुंबईची खाडी एक महत्त्वाचा भाग आहे, असे खारघरचे कार्यकर्ते नरेशचंद्र सिंग यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळforestजंगल