शहरं
Join us  
Trending Stories
1
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
2
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
3
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
4
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
5
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
6
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."
7
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
8
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
9
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
10
video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू
11
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
12
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
13
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
14
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
15
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
16
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
17
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
18
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
19
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
20
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा

शिवसेनेचे माजी नगरसेवक एम.के. मढवी यांच्यावर तडिपारीची कारवाई

By नारायण जाधव | Published: October 08, 2022 5:36 PM

शिवसेनेचे माजी नगरसेवक एम.के. मढवी यांच्यावर तडिपारीची कारवाई करण्यात आली आहे. 

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक एम. के. मढवी यांना शुक्रवारपासून मुंबई शहर, ठाणे जिल्हा, रायगड आणि मुंबई उपनगर या चार जिल्ह्यातून पुढील दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. या दोन वर्षांत त्यांना चारही जिल्ह्यात येण्या-जाण्यास बंदी घातली आहे. मढवी यांच्यावर १८ गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये मारहाण, जीवे मारण्याची धमकी आणि आर्थिक फसवणूक, सणांच्या संवेदनशील काळात दंगल घडवणे, खुनाचा प्रयत्न करणे, खून करणे, खंडणीसाठी धमकावणे , सार्वजनिक ठिकाणी मानवी जिवितास धोका पोहचवणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळेच पोलिसांनी त्यांच्यावर तडीपारीची कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, गेल्याच आठवड्यात मढवी यांनी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शिंदे गटात सहभागी होत नसल्याने आपला एन्काऊंटर करू अशा धमक्या पोलीस देत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. परंतु, आरोप केल्यानंतर काही दिवसांतच त्यांना तडीपार केले आहे. या संदर्भात मढवी यांना त्यांची बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली असून १५ सप्टेंबर रोजी त्यांचा जबाबही घेतल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंकडून उल्लेखशिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात भाषण करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात मढवी यांचा उल्लेख केला होता. एकनाथ शिंदे गटाकडून शिवसैनिकांना कशा प्रकारे त्रास दिला जातोय हे सांगताना ठाकरे यांनी मढवी यांचे उदाहरण दिले होते.

एन्काऊंटरची धमकी दिल्याचा आरोपएकनाथ शिंदे गटात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून दबाव टाकला जात आहे. यासाठी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्याकडून एन्काऊंटर करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप मढवी यांनी केला होता. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी नगरसेवक विजय चौगुले यांचा हात असल्याचा आरोप मढवींनी केला होता. एवढेच नाही तर पोलीस उपायुक्तांची बदली न झाल्यास आम्ही सहकुटुंब आत्महत्या करू, असा इशाराही दिला होता.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईShiv Senaशिवसेना