पनवेल : रेडिमेड कपड्यांच्या मालाची चोरी केलेल्या चौघा जणांना पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून जवळपास ४९ लाख ७० हजार ३८७ रुपये किमतीचा माल हस्तगत केला.फिर्यादी गणेश बेचरा वरचंद याने लाइनआळी येथे श्रीमान मेन्स वेअर हे दुकान टाकले होते. त्या दुकानात मॅनेजर असलेल्या निपेशपुरी नर्भयपुरी गोस्वामी (३६), नोकर प्रकाश गोस्वामी (३२) व प्रवीणभाई वरचंद (२०) या तिघांनी संगनमत करून एकूण ८७,९१, ००१ रु पये किमतीचा रेडिमेड कपड्यांचा अपहार करून ते पळून गेले होते. याबाबतची तक्र ार पनवेल शहर पोलीसठाण्यात करताच, वपोनि विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे, पो. उपनिरीक्षक संतोष उगलमुगले, पोलीस उपनिरीक्षक देवीदास पालवे आदींच्या पथकाने या आरोपींचा शोध घेत असताना आरोपी हे अलहाबाद परिसरात लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरील तिघांसह रमेश राजपुरोहित अशा चौघांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४९ लाख ७० हजार ३८७ रु पये किमतीचा माल हस्तगत केला आहे. पुढील तपास पो. उपनिरीक्षक सुनील तारमळे करीत आहेत.
अपहार केलेल्या चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 2:42 AM