सिडको देणार चार कोटींचा बोनस; ‘आझाद’च्या पाठपुराव्याला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 01:19 AM2020-02-05T01:19:59+5:302020-02-05T01:20:30+5:30

४५० कर्मचाऱ्यांचे थकीत

Four crore bonus for CIDCO; Success in the pursuit of 'Azad' | सिडको देणार चार कोटींचा बोनस; ‘आझाद’च्या पाठपुराव्याला यश

सिडको देणार चार कोटींचा बोनस; ‘आझाद’च्या पाठपुराव्याला यश

Next

कळंबोली : पूर्वी सिडकोमध्ये कार्यरत असलेले मात्र १५ महिन्यांपासून पनवेल महापालिकेकडे काम करणाºया ५५० सफाई कामगारांना सिडकोकडून थकीत बोनस देण्यात येणार आहे. आझाद कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, लवकरच कामगारांच्या खात्यावर चार कोटींची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे सफाई कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पनवेल महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन आणि त्याअगोदर साफसफाईच्या कामाच्या सेवा हस्तांतरित करून घेतल्या आहेत. नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, कामोठे, तळोजा आणि नावडे येथील वसाहतींमध्ये सिडको या सेवा देत होते. या ठिकाणी अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सफाई कामगार काम करत होते. हे कामगार सेवा हस्तांतरणानंतर पनवेल पालिकेकडे वर्ग करण्यात आले. मनपाने नियमित कामावर येणाºया कामगारांना महापालिकेत कंत्राटी पद्धतीने घेतले.

साई गणेश या ठेकेदाराच्या अंतर्गत हे सफाई कामगार काम करत आहेत. त्यांच्या विविध मागण्यांसाठी संघटनेच्या माध्यमातून महादेव वाघमारे हे लढा देत आहेत. गेल्या पंधरा महिन्यापासूनच्या पगारी सुट्या, तसेच करारनामामध्ये नमूद ्रकेलेल्या इतर सुविधा सफाई कामगारांना मिळाव्यात यासाठी लढा सुरू आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातही याविषयी याचिका दाखल केली आहे. परंतु त्या अगोदर सिडकोने कामगारांना बोनस दिला नव्हता. त्यासाठी काही महिन्यांपासून संघटनेचा सिडकोकडे पाठपुरावा सुरू होता. तसेच आंदोलनाचा इशारा देण्यात आला. याची दखल घेत सिडकोने थकित बोनस देण्याचे मान्य केले. त्यानुसार आरोग्य विभागाकडून सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली आहे.

सफाई कामगारांना सिडकोकडे असलेली बोनसची रक्कम लवकरात लवकर दिली जाणार आहे. त्याकरिता बँक खाते आणि इतर माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सिडको कामगारांचे पैसे देणार असल्याची भूमिका सुरुवातीपासून आहे.
- डॉ. बी. एस. बावस्कर,
मुख्य आरोग्य अधिकारी,
सिडको

Web Title: Four crore bonus for CIDCO; Success in the pursuit of 'Azad'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.