शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

तुर्भे रेल्वेस्थानकासमोर चार किलो गांजा जप्त, एका आरोपीस अटक, अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 6:54 AM

अमली पदार्थ विरोधी पथकाने तुर्भे रेल्वस्थानकासमोर कारवाई करून, ४ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. तोफिक वली पटेल (४१) या आरोपीला अटक केली.

 नवी मुंबई : अमली पदार्थ विरोधी पथकाने तुर्भे रेल्वस्थानकासमोर कारवाई करून, ४ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. तोफिक वली पटेल (४१) या आरोपीला अटक केली.अमली पदार्थमुक्त नवी मुंबई करण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वतीने विशेष मोहीम राबविली जात आहे. तुर्भे रेल्वेस्थानक व एनएमएमटी डेपोच्या समोरील बाजूला एक व्यक्ती गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राणी काळे यांना मिळाली होती. याविषयी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी गुन्हे शाखेचे उपआयुक्त तुषार दोशी, नितीन कौसडीकर यांना माहिती दिली. १३ सप्टेंबरला रात्री १२ ते १ वा. सुमारास रेल्वेस्थानकात सापळा रचण्यात आला होता. एक व्यक्ती संशयास्पदरीत्या उभी असल्याचे निदर्शनास आले. माहितीदाराने केलेल्या वर्णनाप्रमाणेच ती व्यक्ती असल्याचे लक्षात येताच, त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे दोन खाकी गठ्ठे सापडले. गठ्ठ्यांमध्ये पाने, फुले, बिया व काड्या संलग्न असलेला उग्र वास येत असलेला गांजा आढळून आला. ४ किलो १०० ग्रॅम वजनाच्या या गांजाची बाजारभावाप्रमाणे किंमत ४८ हजार १३० रुपये आहे.एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क) २० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेला आरोपी तोफिक वली पटेल हा मूळ उस्मानाबादमधील बेंबळेगाव येथे राहणारा आहे. या ठिकाणी तुर्भेनाका हनुमाननगर येथे वास्तव्य करत होता. आरोपीला अटक करण्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक राणी काळे, अजिम गोळे, संजय चौधरी, सलीम इनामदार, इकबाल शेख, संतोष गायकवाड, कासम पिरजादे, रमेश उटगीकर, सचिन भालेराव, राजेश गाढवे, अमोल कर्डिले, अमोल गागरे, सुप्रिया ठाकूर, आकाश मुके, बाबासाहेब सांगोळकर यांनी सहभाग घेतला.तुर्भे रेल्वेस्टेशन परिसरात धाड टाकून, ४ किलो १०० ग्रॅम गांजा हस्तगत केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.- विनोद चव्हाणवरिष्ठ पोलीस निरीक्षक

टॅग्स :Crimeगुन्हा