नवी मुंबई : जुईनगर येथील बँक आॅफ बडोदा दरोडाप्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी पकडले आहे. दरोड्यासाठी वापरलेली दोन वाहनेही जप्त केली आहेत. महापालिकेच्या सीसीटीव्ही कॅमेºयांमुळे आरोपींची ओळख पटविणे पोलिसांना शक्य झाले. अद्याप कोणाला अटक केली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.दरोडेखोरांनी ५ फूट खोल, ३ फूट रुंद व ३० फूट लांबीचा बोगदा खोदून बँकेचे ३० लॉकर फोडले. जवळपास ३ कोटी रुपयांचे दागिने व रोख रक्कम पळवून नेली. नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी तपासासाठी १० पथके तयार केले आहेत. पोलिसांनी चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आरोपींनी पळून जाण्यासाठी वापरलेली दोन वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. चार संशयितांची नेरूळ पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे.
नवी मुंबई बँक दरोड्यातील चार संशयित ताब्यात, सीसीटीव्हीमुळे आरोपी सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 2:40 AM