आदिवासी पाड्यातील चार तरुणांना मारहाण, आठ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 05:01 PM2018-03-15T17:01:36+5:302018-03-15T17:01:36+5:30
खारघर टेकडीवर असलेल्या फणस्वाडी आदिवासी पाड्यातील चार तरुणांना खारघर गावातील काही तरुणांनी काठ्या आणि लोखंडी बारने मंगळवारी (दि.13) मारहाण केली होती. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर अनुसुचित, जाती जमाती कायद्यानुसार खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेल : खारघर टेकडीवर असलेल्या फणस्वाडी आदिवासी पाड्यातील चार तरुणांना खारघर गावातील काही तरुणांनी काठ्या आणि लोखंडी बारने मंगळवारी (दि.13) मारहाण केली होती. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर अनुसुचित, जाती जमाती कायद्यानुसार खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त प्रकाश निलेवाड करीत आहेत. या घटनेत चार आदिवासी तरुणांना गंभीर दुखापत झाली आहे.
कुणाल पाटील, अंकुश शामराव गिरी, गोरखनाथ पांडुरंग पाटील, राजेश पदु पाटील, प्रणव सुनील कासारे, अरुण पाटोळे, संतोष होळकर, नरसू उर्फ नरसिंह भगवान पाटील या आरोपींनी पाड्यातील नामदेव बबन पारधी, महादेव पारधी, रामा पारधी आणि संतोष भले या चार आदीवासी तरुणांना मारहाण केली.
दरम्यान, पोलिसांनी आरोपींना अटक करून ज़िल्हा सत्र न्यायालयात दाखल केले असता, त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी कुणाल पाटील हा खारघर गावातील रहिवासी आहे. त्याच्या मालकीचा फणसवाडी येथे फ़ार्महाऊस आहे. त्याठिकाणी आपल्या मित्रांसह पार्टी करण्यासाठी गेला आसताना हा प्रकार घडला आहे.