नवी मुंबईत 'दा विंसी शी रोबोटिक सर्जिकल सिस्टीम'चे चौथे जनरेशन लाँच

By नारायण जाधव | Published: April 2, 2023 05:30 PM2023-04-02T17:30:28+5:302023-04-02T17:30:45+5:30

नवी मुंबईत 'दा विंसी शी रोबोटिक सर्जिकल सिस्टीम'चे चौथे जनरेशन लाँच करण्यात आले. 

fourth generation of Da Vinci Xi Robotic Surgical System launched in Navi Mumbai | नवी मुंबईत 'दा विंसी शी रोबोटिक सर्जिकल सिस्टीम'चे चौथे जनरेशन लाँच

नवी मुंबईत 'दा विंसी शी रोबोटिक सर्जिकल सिस्टीम'चे चौथे जनरेशन लाँच

googlenewsNext

नवी मुंबई : अपोलो कर्करोग केंद्र, नवी मुंबई यांजकडून आज चौथ्या जनरेशनची प्रगत ‘दा विंसी शी रोबोटिक सिस्टम’ लॉंच करण्यात आली. दा विंसी शी रोबोटिक सिस्टमचे लाँच होणे हे रोबोटिक कोलोरेक्टल कर्करोगाबद्दल जागृती करणारा परिसंवाद आहे जो भारतातील मोठे आतडे आणि गुदद्वाराच्या शल्यचिकित्सकांच्या समितीसोबत (ACRSI) आयोजित करण्यात आला आहे. दा विन्सी शी रोबोटिक सिस्टम ही सर्जिकल आणि रोबोटिक तंत्रज्ञानांमधील नाविन्याचे प्रतिनिधित्व करते ज्यातून प्रगत इंस्ट्रुमेंटेशन, दृष्टी आणि इंटिग्रेट केलेल्या टेबल मोशन १ सारखी वैशिष्ट्ये, त्यातील वैविध्य आणि लवचिकता ही ऑपरेटिंग रूममध्ये कार्यक्षमतेला प्रोत्साहन देते.

श्री.संतोष मराठे, सीईओ-प्रादेशिक पश्चिम विभाग,अपोलो हॉस्पिटल्स दा विंसी शी रोबोटिक सर्जिकल सिस्टमच्या लाँचबद्दल बोलताना म्हणाले,“रोबोटिक शस्त्रक्रियेच्या जगतामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणेल इतकी महत्त्वाची असलेली आधुनिक दा विंसी शी रोबोटिक सिस्टम लाँच करताना आम्हाला गर्व वाटत आहे. क्लिष्ट शस्त्रक्रियांची गरज असलेल्या प्रकरणांमध्ये क्लिनिकल परिणामांमध्ये हे परिवर्तन नक्की घडवून आणेल याबाबत आम्हाला खात्री आहे. आमच्या रूग्णांना अत्यंत आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि सेवा प्रदान करण्याच्या आमच्या वचनाला हे पूर्णत्वास नेणारे आहे. कोलोरेक्टल शस्त्रक्रिया, युरॉलॉजी, आँकोलॉजी, गायनेकोलॉजी, घशाची शस्त्रक्रिया, हृदयाची, लहान बाळांच्या आणि जठर व आतड्यांच्या शस्त्रक्रियांमध्ये, मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपणामध्ये याचा वापर करता येऊ शकेल. अपोलो हॉस्पिटल्स या उपक्रमासाठी शल्यचिकित्सकांना व वैद्यकसेवा देणाऱ्या मनुष्यबळाला प्रशिक्षण देण्याबरोबरच शस्त्रक्रियेनंतरच्या सेवेसाठी आणि पुनर्वसन शुषृषेसाठी तितकीच गुंतवणूक करणार आहेत.”

डॉ.अनिल डी’क्रूझ, कर्करोग विभागाचे संचालक-सल्लागार, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई म्हणाले,“रोबोटिक कार्यपद्धती या उघड्या आणि लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियांसाठी सुरक्षित व परिणामकारक पर्याय आहेत, ज्या तांत्रिकरीत्या आव्हानात्मक परिस्थितींमध्ये उपाय करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. कोलोरेक्टल शस्त्रक्रियांसारख्या बहु-आयामी क्रियांमध्ये रोबोट-साहाय्यित शस्त्रक्रियेच्या बाबतीत वेगळीच आव्हाने निर्माण होतात ज्या ठिकाणी दा विंसी शी रोबोटिक सिस्टम पोटाच्या सर्व आयामांचा उत्तम दृष्टी, उत्तम अर्गोनॉमिक्स, लहानसा भाग चिरणे आणि संसर्गाचा कमी धोका अशा प्रकारचे लाभ देते. ते शल्यचिकित्सकांना क्लिष्ट शस्त्रक्रिया उत्तम अचूकतेने, कमी रक्तस्त्रावासह आणि रूग्णांना कमी काळात बरे होण्यास मदत करते. शल्यचिकित्सकांना सुधारित अर्गोनॉमिक्स आणि 3डी चष्म्यांचा फायदा होतो. शस्त्रक्रियेतील दगावण्याची शक्यता, जखमेला संसर्ग होणे कमी करते आणि जगण्याची शक्यता वाढवते.''

डॉ.अमोलकुमार पाटील, ज्येष्ठ सल्लागार, युरो-आँकोलॉजी, यकृत प्रत्यारोपण -रोबोटिक शस्त्रक्रिया, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई म्हणाले, “अपोलोमध्ये आम्ही कायम नवीन तंत्रज्ञानाला स्वीकारले आहे आणि दा विंसी शी रोबोटिक सिस्टम हे आमच्या रूग्णांना शक्य तितकी उत्तम शुषृषा देण्याच्या आमच्या वचनबद्धतेला साजेसे साधन म्हणून एक उत्तम उदाहरण आहे. त्यातील प्रगत तंत्रज्ञानासह रोबोटिक सिस्टम आपल्याला यकृत प्रत्यारोपणे आणि महत्त्वाच्या युरो-आँकोलॉजी कार्यपद्धती अधिक अचूकतेने, सुरक्षेसह आणि परिणामकारकरीत्या करण्यात मदत करेल. दा विंसी शी रोबोटिक सिस्टम ही आमच्या रूग्णांच्या आयुष्यात महत्त्वाचा बदल घडवून आणेल याबद्दल आम्हाला कोणतीही शंका वाटत नाही''.

 

Web Title: fourth generation of Da Vinci Xi Robotic Surgical System launched in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.