कोटींची वीजचोरी चोरांचा क्लृप्त्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2021 11:15 AM2021-12-28T11:15:44+5:302021-12-28T11:15:55+5:30

कोरोनाकाळात पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे महावितरणला मोठ्या फटका बसला. या थकित वीजबिल वसुलीचा सपाटा महावितरणने लावला आहे. 

Fraud of crores of electricity thieves! | कोटींची वीजचोरी चोरांचा क्लृप्त्या !

कोटींची वीजचोरी चोरांचा क्लृप्त्या !

googlenewsNext

वैभव गायकर

पनवेल : वर्षभर महावितरणने मोठ्या प्रमाणात माेहिमा राबवत शेकडो वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणली. या कारवाईदरम्यान करोडोंची वीजचोरी झाल्याचे समोर आले. वीजचोरीदरम्यान अनेक क्लुप्त्या वीजचोरांकडून लढविल्या जातात. कोरोनाकाळात पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे महावितरणला मोठ्या फटका बसला. या थकित वीजबिल वसुलीचा सपाटा महावितरणने लावला आहे. 

वीजचोरीसाठी कायपण ....
वीजचोरीसाठी अनेक फंडे वापरले जात आहेत.  मीटरमध्ये लूप टाकणे, सी.टी. शॉट करणे, सी.टी.ची लांबी कमी करणे, अशा पर्यायांचा वापर केला जातो. ग्रामीण भागात विजेच्या तारेवर आकडा टाकतात.

वर्षभरात १५०० पेक्षा जास्त चोऱ्या 
पनवेल परिसरात १५०० पेक्षा जास्त वीजचोरी झाल्याच्या घटना घडल्या. यामध्ये वीजबिल थकितदारांची संख्या मोठी आहे.

सर्वाधिक वीजचोरी या ठिकाणी 
पनवेल परिसरातील शहरी आणि ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. यासंदर्भात आजवर अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वीजचोरी कराल, तर जेलची हवा 
- वीज ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक वीज युनिटचे बिल भरणे अपरिहार्य असताना वीजबिल चुकविण्यासाठी काहीजण विद्युत मीटरमध्ये फेरफार करून महावितरणची फसवणूक करतात. परंतु ही वीजचोरी उघड झाल्यास संबंधित व्यक्तीच्या घरात कायमचा अंधार होऊ शकतो. एवढेच नव्हे, तर फौजदारी स्वरुपाची कारवाई होऊन प्रसंगी तुरुंगाची हवा खाण्याचीही वेळ येऊ शकते.

Web Title: Fraud of crores of electricity thieves!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज