शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
3
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
4
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
5
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
6
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
7
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
8
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
9
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
10
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
12
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
13
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
14
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
15
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
16
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
17
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
18
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
19
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
20
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल

दामदुप्पट देण्याच्या बहाण्याने फसवणूक

By admin | Published: January 26, 2017 3:29 AM

जादा नफ्याचे आमिष दाखवून ७२ लाखांचा अपहार झाल्याची घटना न्हावाशेवा येथे घडली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

नवी मुंबई : जादा नफ्याचे आमिष दाखवून ७२ लाखांचा अपहार झाल्याची घटना न्हावाशेवा येथे घडली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पनवेल येथे कार्यालय थाटून त्यांनी अनेकांची आर्थिक फसवणूक केली आहे.कंपनीत गुंतवणूक करुन जादा नफा कमवण्याचे आमिष दाखवून न्हावा ग्रामस्थांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी पुष्पाताई घरत (५०) यांनी न्हावा शेवा पोलिसांकडे तक्रार केली आहे. या प्रकारात अनेकांची आर्थिक फसवणूक झालेली असून त्यापैकी १८ गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. त्यानुसार महेश पाटील, महेश नाईक व सुरेश यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश देवरे यांनी सांगितले. या तिघांनी पनवेल येथे बनावट कंपनीचे कार्यालय थाटले होते. सदर कंपनीत आर्थिक गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळेल असे आमिष त्यांच्याकडून दाखवले जात होते. यानुसार अनेकांनी १ हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक सदर कंपनीत केली होती. मात्र वर्षाचा कालावधी पूर्ण होवूनही त्यापैकी कोणालाही कंपनीकडून नफ्याची रक्कम अथवा गुंतवणूक केलेल्या मूळ रकमेचा परतावा मिळाला नाही. यामुळे त्यांनी संबंधितांकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. अखेर संधी साधून त्या तिघांनी बनावट कंपनीचे कार्यालय बंद करुन पळ काढला. (प्रतिनिधी)