कर्जाच्या बहाण्याने तीन हजार नागरिकांची फसवणूक, साडेसात कोटीला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 04:18 AM2019-01-06T04:18:32+5:302019-01-06T04:19:07+5:30
साडेसात कोटीला गंडा : प्रत्येकी ३० हजार अनामत रक्कम
नवी मुंबई : महापे-रबाळे एमआयडीसीमधील ज्ञानेश्वर फायनान्स कंपनीने कर्ज देण्याच्या बहाण्याने तीन हजारपेक्षा जास्त नागरिकांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. साडेसात कोटी रुपयांना गंडा घातल्याचा ठपका ठेवून कंपनीचा मालक अनिकेत इंदलकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
येथील बच्चा हाउसमध्ये अनिकेत इंदलकर याने ज्ञानेश्वर फायनान्स ही कंपनी सुरू केली होती, त्याने तीन हजारांपेक्षा जास्त नागरिकांना कमी व्याजदराने व विनातारण कर्ज देण्याचे आमिष दाखविले होते, यासाठी सुरक्षा अनामत रक्कम म्हणून नागरिकांकडून ३० हजार व त्यापेक्षा जास्त रक्कम गोळा केली होती. साखळी पद्धतीने कंपनीचे काम सुरू होते. सभासदांच्या मार्फत जास्त सभासद करण्यास सुरुवात केली होती. घाटकोपर येथे राहणारे चिंतामण गांगुर्डे यांनीही आॅक्टोबर २०१८ मध्ये या कंपनीमध्ये सुरक्षा अनामत रक्कम भरली होती. कंपनी संचालकांनी सुरक्षा अनामत रक्कम स्वीकारून फसवणूक केली असल्याची तक्रार रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ सहकलम ३, ४ व ५, पुरस्कार चिठ्ठी आणि पैशांचा खप योजना बंदी अधिनियम १९७८ अन्वये व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित साबळे करत आहेत.
च्तीन हजारांपेक्षा जास्त नागरिकांना कमी व्याजदराने व विनातारण कर्ज देण्याचे आमिष दाखविले होते. साखळी पद्धतीने कंपनीचे काम सुरू होते.