सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक
By admin | Published: January 9, 2016 02:22 AM2016-01-09T02:22:11+5:302016-01-09T02:22:11+5:30
फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर आयुर्वेदिक कोमासिड्स औषध देऊन फसवणूक करणाऱ्या दोघांना खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे.
पनवेल : फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर आयुर्वेदिक कोमासिड्स औषध देऊन फसवणूक करणाऱ्या दोघांना खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. दोघांपैकी एक नायजेरियन नागरिक आहे.
सांगली येथे राहणारे अमरसिंह राजाराम सूर्यवंशी यांची गेल्या ५ महिन्यांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून केथरेन डोयल नावाच्या नायजेरियन नागरिकासोबत ओळख झाली होती. डोयल यांनी ते स्वत: मिडा फार्मास्युटीकल युकेतील कंपनीचा खरेदी - विक्रीचा व्यवहार पाहत असल्याचे सांगितले व त्यांच्या कंपनीत आयुर्वेदिक कोमासिडस मोठ्या प्रमाणात लागत असल्याचे सांगितले. त्यानुसार तुम्ही आम्हाला कोमासिडस मिळवून दिले तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल, असे सांगितले.
नोव्हेंबर महिन्यात डोयलने फेसबुकवर संदेश पाठवून प्रियंका जैनकडून २५0 गॅ्रमचे १ लाख ६० हजार रु पये किमतीचे कोमासिडस पाकीट घेण्याचा सल्ला दिला.
७ जानेवारी २०१६ रोजी प्रियांका जैनने फोन करून खान नामक माणूस येऊन तुम्हाला कोमासिडसचे पाकीट देईल, त्याला तुम्ही पैसे द्या, असे सांगितले. काही वेळानंतर इस्मीतसिंग अरोरा नावाची व्यक्ती तुम्हाला वाशीला तुंगा हॉटेलसमोर भेटेल, असे सांगितले. यावेळी संशय आल्याने सूर्यवंशी यांनी खांदेश्वर पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले. पोलिसांच्या मदतीने वाशीला पोहोचले असता इस्मीतसिंग व एका निग्रो व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले.