मधुकर ठाकूर -
उरण : उरण येथील ओएनजीसी प्रकल्पाच्या वतीने बुधवारी (९) मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.म्हातवली येथील सोमवंशी क्षत्रिय पाठारे सभागृहात उरण शासकीय विभागाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराचा परिसरातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.
या शिबिरात डोळे,श्वसन तपासणी आणि चष्मे, औषधे, पौष्टिक आहार वाटपही करण्यात आले. ओएनजीसी उरण प्रकल्पाचे मुख्य प्रकल्प अधिकारी सुभोजीत बोस यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. याप्रसंगी म्हातवली ग्रामपंचायतीच्या सरपंच रंजना पाटील,नागाव सरपंच चेतन गायकवाड, उपसरपंच भुपेंद्र घरत, ग्रामविकास अधिकारी किरण केणी, ओएनजीसीचे विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी,आरोग्य विभागाचे अधिकारी, परिसरातील नागरिक उपस्थित होते.
या आयोजित शिबिरात ओएनजीसी उरण प्रकल्पाचे मुख्य प्रकल्प अधिकारी सुभोजीत बोस,म्हातवली ग्रामपंचायतीच्या सरपंच रंजना पाटील,नागाव सरपंच चेतन गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.