कळंबोली गावाकरिता स्वतंत्र भुयारी मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 02:21 AM2018-06-27T02:21:44+5:302018-06-27T02:21:46+5:30
पनवेल-मुंब्रा महामार्गावर बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलामुळे कळंबोली गावात जाण्याकरिता रस्ता राहणार नाही. त्यामुळे स्थानिक नगरसेवकांनी आंदोलन करून
अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : पनवेल-मुंब्रा महामार्गावर बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलामुळे कळंबोली गावात जाण्याकरिता रस्ता राहणार नाही. त्यामुळे स्थानिक नगरसेवकांनी आंदोलन करून हे काम बंद पाडले होते. त्यांच्या मागणीनुसार रस्ते विकास महामंडळाने येथे भुयारी मार्गाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे भविष्यात कळंबोली गावात जाण्यासाठी वळसा मारण्याची गरज पडणार नाही.
पनवेल-मुंब्रा महामार्गावर कळंबोली अग्निशमन केंद्राजवळ स्टील मार्केटकडे जाण्यासाठी क्र ॉसिंग आहे.परंतु येथून जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत असे. कारण दोनही बाजूने भरधाव वाहने येतात. येथे दररोज लहान-मोठे अपघात घडत असत. त्यामुळे येथे उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग बांधावा, यासाठी पाठपुरावा सुरू होता. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यासंदर्भात आग्रही भूमिका घेतली होती. अपघात आणि वाहतूककोंडीवर उपाय म्हणून रस्ते विकास महामंडळाने या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कळंबोली स्टील मार्केटलगत ६१.३७ कोटी रुपये खर्च करून उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
कळंबोली गावातील काळभैरव मंदिरापासून ते पाण्याच्या टाकीच्या काही मीटर अगोदर हा पूल बांधण्यात येत आहे.
पुलाची लांबी ११३0 मीटर असल्याने कळंबोली गावात जाणारा मार्ग बंद होणार आहे. त्यामुळे गावात राहणाऱ्यांना कळंबोली सर्कल किंवा वसाहतीतून जावे लागणार आहे. ही गैरसोय होवू नये म्हणून पर्यायी व्यवस्था करावी या मागणीकरिता शेकापचे नगरसेवक रवींद्र भगत आणि गोपाळ भगत यांनी रस्ते विकास महामंडळाविरोधात आंदोलन केले होते. त्याचबरोबर उड्डाणपुलाचे काम सुध्दा बंद केले होते. ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत काम करू न देण्याचा इशारा त्यांनी दिला होता. स्थानिकांच्या मागणीचा विचार करून याठिकाणी अंडरपास अर्थात भुयारी मार्ग बांधण्यास रस्ते विकास महामंडळाने तयारी दर्शविली आहे. तशा आशयाचा प्रस्तावही संमत करण्यात आला आहे.
या कामासाठी अतिरिक्त तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उड्डाणपुलाचे बांधकाम करणाºया कंपनीचे व्यवस्थापक
प्रदीप दहातोंडे यांनी त्यास दुजोरा दिला आहे.