पोलिसांचा सिटी बसमधील मोफत प्रवास आता बंद

By नारायण जाधव | Published: October 27, 2022 04:28 PM2022-10-27T16:28:00+5:302022-10-27T16:29:20+5:30

बेस्ट, एनएमएमटीसह सर्व शहर परिवहन सेवांचा समावेश

free travel of police in city bus now closed in navi mumbai | पोलिसांचा सिटी बसमधील मोफत प्रवास आता बंद

पोलिसांचा सिटी बसमधील मोफत प्रवास आता बंद

googlenewsNext

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : मुंबई पोलीस दलासह राज्यातील सर्व पोलिसांना त्या त्या महापालिकांच्या शहर परिवहन सेवांमधून आता मोफत प्रवास करता येणार नाही. यामुळे मुंबई महापालिकेची बेस्ट, नवी मुंबई महापालिकेची एनएमएमटी, केडएमसीची केडीएमटी, ठाणे महापालकेची टीएमटीसह राज्यातील कोणत्याच महापालिकांच्या परिहवन सेवांच्या बसमधून पोलिसांना आता मोफत प्रवास करता येणार नाही. पोलिसांना देय असलेला वाहतूक भत्त्याचा आता त्यांच्या पगारात समावेश केल्याने गृह विभागाने २१ ऑक्टोबर २०२२ रोजी विशेष आदेश काढून पोलिसांना महापालिकांच्या परिवहन सेवांच्या बसमधून मोफत प्रवेश करता येणार नाही, याबाबतचे निर्देश दिले आहेत.

गृह विभागाने ४ मार्च १९९१ रोजी विशेष आदेश काढून बेस्ट पुणे, सोलापूर, कोल्हापूर महापालिकांच्या परिवहन सेवांच्या बसमधून मोफत प्रवासाची मुभा दिली होती. कालांतराने ही सवलत नवी मुंबई महापालिकेची एनएमएमटी, केडएमसीची केडीएमटी, ठाणे महापालकेची टीएमटीसह इतर महापालिकांच्या परिवहन सेवांनाही लागू करण्यात आली. याबदल्यात गृह विभाग त्या त्या महापालिकेस दरवर्षी विशेष अनुदान देत असे.

म्हणून केली सवलत बंद

मुंबईसह राज्यातील इतर महापालिका क्षेत्रातील बहुसंख्य पोलीस शासकिय वाहने किंवा खासगी वाहनांनी कामावर जात असल्याचे निर्दशनास आल्यानंतर त्यांना रेल्वेसह परिवहन सेवांना अनुदान म्हणून देण्यात येत असलेला वाहतूक भत्ता आता एप्रिल २०२२ पासून पोलिसांच्या पगारात देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गृह विभागाने आता पोलिसांचा सिटीमधील मोफत प्रवासाची सवलत बंद केली आहेयामुळे हात दाखवून वाट्टेल तिथे बस थांबवून फुकट प्रवास करणार्या पोलिसांच्या मनमानीसही यामुळे आळा बसणार आहे. तसेच कंडक्टरकडून रितसर तिकिट घेऊनच त्याना सिटी बसमधून प्रवास करावा लागणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: free travel of police in city bus now closed in navi mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.